WhatsApp

Akola Crime पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला! जबरदस्ती लग्नाचा राग, भाचीला ठार मारण्याच्या उद्देशाने जंगलात नेत असताना अडथळा आणला म्हणून हल्ला!.

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १३ जुलै :- Akola Crime पातूर घरच्या लोकांच्या विरोधात लग्न केलेल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्यावर मुलीच्या दोन मामा आणि आजीने हल्ला केला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोळी रस्त्यावर घडली.

Akola Crime मुलीचे अपहरण आणि पोलिसांचा प्रयत्न
पातूर तालुक्यातील नवेगाव येथील एका मुलाचे गावापासून जवळच असलेल्या पिंपळडोळी गावातील एका मुलीवर प्रेम होते. तीन महिन्यांपूर्वी दोघेही गाव सोडून गेले होते. परंतु नुकतेच ते नवेगावमध्ये परतून लग्न करून आले. लग्नाची माहिती मुलीच्या नातेवाइकांना मिळाल्यावर ते नवेगावला पोहोचले आणि जबरदस्ती मुलीला ताब्यात घेऊन पिंपळडोळीकडे घेऊन जात होते. याबद्दल मुलाच्या नातेवाइकांनी आलेगाव पोलिस चौकीला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे घटनास्थळी पोहोचले आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Akola Crime मामांनी केला हल्ला
पोलिसांनी मुलीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच मुलीच्या दोन्ही मामांनी (संगम रंभाजी ताजने आणि विजय रंभाजी ताजने) पोलिस कॉन्स्टेबल सांगळे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण, उपनिरीक्षक गजानन केदार आणि पद्माकर पातोंड यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Akola Crime गुन्हा दाखल आणि अटक
या प्रकरणी चान्नी पोलिसांनी दोन्ही आरोपी मामांवर (संगम ताजने आणि विजय ताजने) गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Akola Crime पोलिसांची संख्या कमी
या घटनेने आलेगाव पोलीस चौकीमधील मनुष्यबळ टंचाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आलेगाव पोलिस चौकीमध्ये केवळ दोन पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांनाच 12 गावांचा कारभार सांभाळावा लागतो. यामुळे अशा घटना घडतात अशी नागरिकांची तक्रार आहे.

Akola Crime नागरिकांची मागणी
या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिस दलात मनुष्यबळ वाढवण्याची आणि पोलिसांना आवश्यक ती सुविधा पुरवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!