WhatsApp

Akola Crime बकरी ईदनिमित्त अवैध धंद्यावर कारवाई! गावठी पिस्टल ५ जिवंत काडतुसांसह आरोपी अटक!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक, १५ जून २०२४:- Akola Crime बकरी ईद सणानिमित्त अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या आदेशानुसार, स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आज उरळ हद्दीतील कवठा गावात छापा मारून एका व्यक्तीला गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बाळापूर उपविभागात अवैध धंद्यावर रेड करणे कामी गस्ती करत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, उरळ हद्दीतील कवठा गावातील एक व्यक्ती त्याच्या ताब्यात गावठी पिस्टल बाळगून आहे.

या माहितीच्या आधारे, पथकाने त्वरित कारवाई करत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. Akola Crime आरोपीचे नाव रघुवीर तेलसिंग चौहाण (वय ३०) असून तो फुकट पुरा जलाराम मंदीर जवळ जळगाव जामोद, बुलढाणा येथे राहतो.

आरोपीवरून पोलिसांनी एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), ०५ जिवंत काडतुसे, वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ७१,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रघुवीर चौहाण याच्यावर कलम ३, २५ आर्मज अॅक्ट आणि कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला Akola Crime उरळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कार्यवाही ही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे पोलीस उप निरीक्षक गोपाल जाधव, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकूळ चव्हाण, वसीम शेख, भिमराव दिपके, चालक पो. हवा अक्षय बोबडे यांनी केली आहे.

पोलिसांनी नागरिकांना Akola Crime अवैध धंद्यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!