WhatsApp

Akola Crime पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या ७ तरुणांना अटक केली! पीस्टल ७ काडतूस सह ७.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ३० मे २०२४ राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव :- Akola Crime अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात एका धक्कादायक घटनेत ७ तरुणांना अग्निशस्त्र आणि इतर धारदार शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे. या तरुणांकडे एक पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार देखील जप्त करण्यात आली आहे.

Akola Crime पोलीसांना मिळाली गुप्त माहिती:

दिनांक ३० मे रोजी, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गोकुल राज यांना गुप्त माहिती मिळाली की, खामगांव (बुलढाणा) मधून एक पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार (MH-37 AD-3490) बाळापूरकडे निघाली आहे आणि त्यात ७ तरुण इसम बसलेले आहेत. या तरुणांकडे अग्निशस्त्र असून ते कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचा बेत आखत आहेत.

नाकाबंदी आणि कारची तपासणी: Akola Crime

या माहितीच्या आधारे, श्री गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी त्वरित कारवाई सुरू केली. वाडेगाव (ता. बाळापूर) येथे सिध्दार्थ चौकवर नाकाबंदी करण्यात आली. अंदाजे ५ वाजताच्या सुमारास, संशयित इर्टीगा कार दिसली आणि ती थांबवण्यात आली.

कारमधून राहुल खिल्लारे (वय 26, रा.शाहूनगर, हिंगोली), ऋतिक वाढवे (21, पिंपळखेड, हिंगोली), सुर्यकिरण चोरमल (23, इसापूर रमना, हिंगोली), अंकुश कंकाळ (22, सावरगाव बर्डी, वाशिम), नितेश राखी (35, जांभरुण जहांगीर, वाशिम), सुमित पुंडगे (22, पिंपळखेड, हिंगोली) आणि देवानंद इंगोले (26, सावळी, वाशिम) असे सात इसम सापडले.

Akola Crime
Akola Crime

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता राहुल खिल्लारे याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तुल आणि सात जिवंत गोळ्या मिळाल्या. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 60 हजार रुपयांचे मोबाईल देखील होते. तर कारचालक नितेश राखी याच्याकडून पोलिसांनी सात लाख रुपयांची पांढरी इर्टिगा कार जप्त केली. अशा प्रकारे पोलिसांना एकूण 7 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.

बाळापूर येथे वरील नमुद आरोपी हे संगणमत करून त्यांचेमध्ये अग्नीशस्त्र लाल तिखट पावडर, दोरी, टॉर्च, एक चाकु बाळगुन रोडने दरोडा टाकण्याचे प्रयत्नात जात असतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द भादंवि व आर्म अॅक्ट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola Crime
Akola Crime

सदरची कारवाई बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक अकोला तसेच श्री गोकुल राज जी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर जि. अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री अनिल जुगळे, API समाधान रिटे, पंकज कांबळे, विनोद पुईकर, ASI विनायक पवार, शिरसाठ, शिवकुमार वर्मा, संजय वानखडे, II.C. सैयद शारीक, संतोष सोळंके, संतोष करंगळे, अंकुश मोरे, रफीक शेख, विजय गि-हे, NPC संजीव कोल्हटकर, गणेश गावंडे, सतिष वाडेकर, पोकॉ. अदक्षय देशमुख, प्रविण अवचार, मोहन ढाकरे, विठठल उकडे (गाडी, गजानन शिंदे, मनिष यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!