WhatsApp


Akola Crime उरळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांवर केलेल्या गोळीबार प्रकरणी पाच आरोपींना अटक २५ हजाराचे ठेवण्यात आले होते बक्षीस

  • पोलीस अधीक्षका यांचे भेटीनंतर १८ तास राबवीली जम्बो शोध मोहीम. Akola Crime
  • ०४ अधिकारी आणि २८ अमंलदार यांचा सहभाग.
  • रात्र भरात शेगाव, हातरून, नखेगाव, नेर थामना, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून असे एकुण ०५ आरोपी ताब्यात.
  • गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकली जप्त.
  • शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेले आरोपी पोलीस गाडी पाठलाग करीत असलल्याचे आणि आपण पकडले जणार या भितीने एका आरोपीने केला पोलीस गाडीवर फायर.

Akola Crime दिनांक ३०/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील रात्रगस्त करणारे अधिकारी हे त्यांचे सहकारी सोबत कर्तव्य बजावीत असतांना रात्री ०३:०० सुमारास ग्राम मांजरी वरून हातरून कडे जात असतांना पोलीस गस्त वाहनाला दोन मोटार सायकलीवर असलेल्या ईसमांवर संशयीत ईसम दुरूनच येतांना दिसून आल्याने त्यांनी आपली शासकीय वाहन थांबवून येणा-या मोटार सायकल चालकाना थांबविण्याचा ईशारा केला असता त्यांना समोर पोलीस Akola Crime असल्याची चाहुल लागल्याने त्यांनी आपआपली मोटार सायकली वळवून

akola esobati add
akola esobati add

पळूण जाण्याच्या उद्देशाने जात असता पोलीसांना त्याचे वर संशय आल्याने पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याचा पाठलाग केला असता, पोलीस त्यांना पकडणार तेवढ्याचे मोटार सायकल स्वार याचे मागे बसलेल्या ईसमाने पोलीसांच्या गाडीचे काचवर अग्निशस्त्र ने फायर केला असता गाडीचा काच फुटली ज्यात पोलीस गाडीतील चालक चे डोळ्याला ईजा झाली होती. ज्यामुळे फायदा घेवून आरोपी पसार झाले होते. सदर गुन्हयात आरोपीतांना पोलीसांना जिवेमारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केल्याचे तपासा दरम्याण निष्पन्न झाल्याने कलम ३०७ भा.दं.वि वाढविण्यात येत आहे.

Akola Crime
Akola Crime

जिल्हयात प्रथमच पोलीसांचे गाडीवर झालेल्या गोळीबाराचे घटनेचे जिल्हयात तसेच राज्याच पडसाद उमटून विविध चर्चाना उधान असता, गुन्हेगार यांना जेरबंद करने जिल्हा पोलीसांना आव्हान ठरले होते. घटना घडल्या पासून स्थागुशा यांचे एक पथक हे पो. स्टे उरळ व परिसरात गोपनिय माहीती संकलीत करीत होते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून घटनेच्या ठिकाणी दिनांक १३/१/२०२३ रोजी सकाळी १०:०० वा भेट देवून गोळीबार झालेल्या ठिकाणी अधिकारी आणि अमंलदार यांना सुचना देवून आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेशीत होते

तसेच सदर गोळीबार करणा-या घटनेची माहीती जो कोणी देणार त्यास २५,०००/-रु बक्षीस जाहीर केले होते. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंग साहेब यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पो.नि श्री. शंकर शेळके यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा व स्थानीक गुन्हे शाखा कडे प्राप्त झालेल्या गोपनिय माहीतीचा खातरजमा करून याच वेळे पासून कार्यवाही सुरू केली.

ज्यात ०४ अधिकारी आणि २८ अमंलदार यांनी सहभाग घेतला. रात्री १०:०० वाजता सुरू झालेली शोथ मोहीम दरम्याण ग्राम हातरून, नखेगाव, नेर थामना, शेगाव, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून गुन्हा करणारे आरोपी नामे १) अश्विन गणेश मुंडे वय २१ वर्ष रा. ग्राम नखेगाव २) भावेश उर्फ अर्जुन रविंद्र मुंडाले वय १९ वर्ष रा. ग्राम नखेगाव. ह. मु हातरून विटाचे भट्यावर ३) सागर ज्ञानेश्वर चौके वय २५ वर्ष रा. ग्राम नेर धामना. ४) अविनाश भिमराव मुंडाळे वय २६ वर्ष रा. ग्राम नखेगाव. ५) योगेश रामराव मुंडाळे वय २६ वर्ष रा. नखेगाव

यांना ताब्यात घेवून त्यांना खाकी असका दाखवताच आरोपीतांनी घडलेला घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली. आणि गुन्हा केल्याची कबुली दिली. काही आरोपी हे नेहमीच त्या परिसरात शिकारी कटीला फिरत असल्या सुरुवात केलीतील लोकांना व नरखेगावक-यांना माहीती असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, सहा. पोलीस अधीक्षक श्री. गोकुळ राज साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला, सपोनि. श्री कैलास डी. भगत, पोउपनि, गोपाल जाधव स्थागुशा. पो. अमंलदार भास्कर धोत्रे, रविंद्र खंडारे, सुलतान पठाण, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, विशाल मोरे, भिमराव दिपके, स्वप्नील खेडकर, सतीष पवार, चालक नफीज शेख, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, तसेच सायबर सेल चे आशिष आमले तसेच नखेगाव व मेर गाव हे पो. स्टे दहीहांडा ह‌द्दीत येत असल्याने तेथील ठाणेदार योगेश वाघमारे व ०८ अमंलदार यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!