Akola Crice अकोला-वाशिम जिल्ह्यातील मोटरसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने केली अटक

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक १६ मार्च :- Akola Crice अकोला पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. या यशस्वी कारवाईमुळे दोन वेगवेगळ्या मोटरसायकल चोरी प्रकरणांना उघड पडली आहे.

अकोला जिल्ह्यातील पोलिस स्टेशन दहिहंडा येथे चोरी गुन्ह्याची नोंद (अपराध क्र. 187/2023, कलम 379 भादवी) करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी Akola Crice स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.

आरोपीची कबुली आणि मोटरसायकल्स जप्त Akola Crice
गोपनीय माहितीवरून दिपक माणिकराव वानखडे (वय 29, रा. पाचमोरी) या आरोपीला अटक करण्यात आली. विचारपूस केल्यानंतर त्याने दहिहंडा पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यातील स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून वाशिम जिल्ह्यातील पोलिस स्टेशन मालेगाव येथील गुन्ह्यातील एक TVS रेडीऑन मोटरसायकलही जप्त करण्यात आली. दोन्ही मोटरसायकलींचा एकूण 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास चालू आहे. अकोलकरांची मोटरसायकल सुरक्षित राहण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि गोपाल जाधव व पथकातील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हान, फिरोज खान, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, आकाश मानकर, अभिषेक पाठक यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!