WhatsApp

Akola Bar Closed उद्या अकोल्यातील सर्व वाईन बार बंद राहणार…

Akola Bar Closed News 2023: राज्य शासनाने नोव्हेंबर महिन्यापासून बार व परमिटरुमवर वॅट टॅक्स ५ टक्क्यावरून १० टक्क्यावर केली आहे. ही करवाढ बार उद्योगासाठी घातक असून रेस्टारंट आणि परमिटरुम उद्योगाची कंबरमोड मोडणारी आहे. त्यामुळे राज्य शासनाने करवाढीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी नागपूर जिल्हा रेस्टॉरेंट परमिट रुम असोसिएशने केली आहे. (Due To Increase in Vat Tax All Bar From Akola District will be Remain Closed ) यासाठी १६ नोव्हेंबरला असोसिएशनच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील सर्व बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने पूर्वी असलेला वॅट कर ५ टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. या विरोधात अकोला वाइन बार असोसिएशनने गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय संप पुकारला. Akola Bar Closed शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी दुपारी निदर्शने केली जाणार असल्याची माहिती अकोला जिल्हा वाईन बार असोशियन ने परिपत्रक काढून दिली. असून सकाळी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्याचे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद केले की, राज्य शासनाने करवाढ ही अन्यायकारक असून, महाराष्ट्रातील बार असोसिएशनला विश्वासात न घेता करण्यात आली आहे. टॅक्स ५ टक्क्यांकवरून वाढवून १० टक्के केल्यास राज्यातील परमिट रूम धारक संकटात येईल. त्यामुळे दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून अकोल शहर आणि परिसरातील वाईन बार बंद Akola Bar Closed ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही निवेदनात नमूद केले. रेस्टॉरेंट परमिट रुंम उद्योग मागील पाच वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. परमिट रुमला हायवेवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देखील उद्योगाला मोठा तोटा झाला.

आता राज्य शासनाने उद्योगावरील वॅट कर वाढवत १० टक्के केला आहे. महाराष्ट्रात १८ हजार परमिटरुम धारक आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयामु‌ळे हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित राहील. याशिवाय वॅट वाढविल्याने राज्याच्या तिजोरीला देखील फायदा होणार नाही. राज्य शासनाने वॅट टॅक्स पूर्णपणे रद्द करून अवैध मालावर कारवाई केली तर शासनाला अधिक प्रमाणात महसूल प्राप्त होईल. Akola Bar Closed

करवाढीमुळे अवैध माल तयार होऊन त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाईल, शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बार १६ नोव्हेंबरला बंद ठेवण्यात येणार आहेत. बार असोसिएशनच्यावतीने अकोल्यातील अशोक वाटिका येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा अशोक वाटिका येथुन दुपारी १२ वाजता निघणार असुन सरळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार असून त्या नंतर जिल्हाधिकाऱ्यान मार्फत लावण्यात आलेला कर कमी करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!