या आंदोलनात उपस्थित बेरोजगार युवकांनी गांधी टोप्या घालून भजे व चहा विक्री करीत सरकारच्या धोरणाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. Akola Agitation against government policies
अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या दिशाहीन धोरणामुळे बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत बेरोजगार युवकांनी सोमवारी (६ नोव्हेंबर) भजे तळून व चहा विकून अभिनव आंदोलन केले. माजी उपमहापौर व युवक नेते निखिलेश दिवेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रतीकात्मक बेरोजगार आंदोलनाचा प्रारंभ जुने शहर, जय हिंद चौक परिसरातील जि. प. उर्दू कन्या शाळेजवळ करण्यात आला.Akola Agitation against government policies या आंदोलनात उपस्थित बेरोजगार युवकांनी गांधी टोप्या घालून भजे व चहा विक्री करीत सरकारच्या धोरणाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. यावेळी रस्त्यांवर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना बेरोजगारी च्या संदर्भातील पत्रकांचे वितरण करण्यात आले. दरम्यान या आंदोलनात अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवित यात सहभाग घेतला.
संयोजक निखिलेश दिवेकर,सहसंयोजक विजय जामनिक, ॲड. फैजल खान यांनी या आंदोलनाचे व्यवस्थापन केले. यावेळी काँगेस नेते विवेक पारसकर, अफरोज लोधी, माजी नगरसेवक नौशाद खान, रहमान बाबू, आझाद खान, आकाश तंबोली, भूषण टाले, रितेश झांबरे, अन्नपूर्णेश पाटील, गीतेश वानखडे, विकास दिवेकर, निलेश तोरणे, जनार्धन बूटे, सरदार खान,मुजाहिद खान,सै. वसीम, बादशहा खान,सोहेल खान,सै. झाकीर, फुहाद खान, इर्शाद खान,अज्जू खान,फैजल खान,नवेद खान,अलतमश खान,फरदिन खान,फैजन खान यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते व बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.