Akola Accident | राष्ट्रीय महामार्गावर डिझेल टँकर पलटी, नागरिकांची डिझेलसाठी झुंबड

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो सिद्धार्थ कांबळे प्रतिनिधी दिनांक २९ मे २०२४ :-Akola Accident राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वणी रंभापुर येथे डिझेल टँकर पलटी झाला आहे. हा टँकर पलटी झाल्यानंतर परिसरात डिझेल सांडले. हे सांडलेले डिझेल भरुन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यातील अनेक नागरिक हे ड्रम, बादली यासह अनेक गोष्टी आणल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची डिझेलसाठी झुंबड पाहायला मिळाली. या संपूर्ण घटनेच्या व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. (Akola Diesel tanker overturned People Rush t0 collect it)

मूर्तिजापूर तालुक्यातील वणी रांभापुर येथील महामार्गावर एक डिझेलचा टँकर Akola Accident पलटी झाला. टँकर पलटी झाल्याचं गावात समजताच, गावकऱ्यांनी हातात जे मिळेल ते घेऊन टँकरकडे धाव घेतली. त्यानंतर, डिझेल पळवण्याचा खेळ सुरू झाला. विशेष म्हणजे एका पठ्ठ्याने 200 लिटरचं टिपाड घेऊन डिझेल नेण्याची तयारी केली होती. मात्र, बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरल्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, लोकांना डिझेल चोरी करण्यापासून अडविण्यात आले.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर, डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल आहे. त्यामुळेच, डिझेलच्या टँकरला अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी Akola Accident घटनास्थळी धाव घेतली, मिळेल त्या भांड्यात डिझेल पळविण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वणी रमभापुर येथून जी जे १२ बी वय ९५७८ क्रमांकाचा डिझेलने भरलेला टँकर जात होता. त्यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील वणी रंभपुर जवळ या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलने भरलेला टँकर रस्त्याच्या खाली जात रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यात गाडीचा क्लिनर जखमी झाला. ड्रायव्हरलाही थोडासा मार लागला.

Leave a Comment

error: Content is protected !!