Akola Accident अकोला-पातूर रस्त्यावर भयानक अपघात: ३ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, आई-वडील जखमी!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो अनुराग अभंग दिनांक २३ मे :- Akola Accident गुरवारी रात्री ८:३० च्या अकोला-पातूर रस्त्यावरील हिंगणा उड्डाणपुलाजवळ एका भयानक अपघातात ३ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चादुर खडकी येथील रहिवासी नितीन देवलाल वाघमारे हे गावच्या जवळ असलेल्या शेतातून जत्रा आटपून घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शुभागी आणि ३ वर्षाची मुलगी समृद्धी होती. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत समृद्धीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितीन यांना किरकोळ मार लागला तर त्यांची पत्नी शुभांगी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या दुसऱ्या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहक जखमी झाले. सध्या अडकलेल्या ट्रकचालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच जूने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. वाघमारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वाहन चालवून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

निष्पाप चिमुकल्या समृद्धीच्या अकाली निधनामुळे तिच्या नातेवाईकांसह चांदुर खडकी गावात शोककळा पसरली आहे. या पाहतात गंभीर जखमी असलेली नितीन वाघमारे यांची पत्नी शुभगी वाघमारे ह्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!