WhatsApp

Akola Accident बहिणीला रेल्वे स्थानकावर सोडून परतणाऱ्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ११ एप्रिल :- Akola Accident बहीण भावाचे नाते हे अतूट नाते राहते भांडण होतात मारामाऱ्या पण होतात पण प्रेम मात्र कमी होत नाही बहीण भावाला राखी बांधून आजन्म रक्षण करण्याचे वचन दिले जाते पण आज मात्र बहीण भावाची कायमची ताटातूट झाल्याची घटना सायंकाळी सह वाजताच्या दरम्यान उगवा फाट्याजवळ जवळ घडली आणि बहीण भावाची कायमची ताटातूट झाली

ऊगवा गावात तुकाराम बीज हा आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमा नंतर महाप्रसाद घेवून उगवा येथील रहिवासी दीपक साखरकर वय अंदाजे ३० ते ३२ वर्ष हा आपल्या बहिणीला रेल्वेस्टेशन वर सोडायला गेला बहीचा निरोप घेऊन दीपक हा परत गावाकडे जाण्यास निघाला आणि आपला भाऊ आता आपल्याला परत कधीच दिसणार नाही याची पुसटशी कल्पना देखील त्याच्या बहिणीला नव्हती आती काळाने तेथेच घात केला.

Akola Accident
दीपक पाखरे (साखरकर)

दीपक साखरकर याने आपल्या बहिणीला रेल्वे स्टेशन वर सोडून आपली दुचाकी क्रमांक एम एच ३० ए एस १३२१ या शाईन दुचाकीने घराकडे निघाला तोच वळणावरून भरधाव येणाऱ्या झायलोने दीपक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली Akola Accident ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत दीपक याची दुचाकी उडून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली या धडकेत उगवा येथील रहिवासी दीपक पाखरे (साखरकर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर झायलो चालकाने गाडी सगट घटनास्थळावरून पळ काढला

पण येथील नागरिकांनी आपले संपर्क लावण्यास सुरुवात केली आणि ही झयलो गाडी गांधीग्राम येथे ग्रामस्थानी पकडली व या वाहन चालकाला चांगलाच चोप दिला त्या नंतर गावकऱ्यांनी ही गाडी व गडीचलकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या दिपकच्या अचानक Akola Accident जाण्याने पोरीसरत हळहळ व्यक्त होत असून गावात या घटनेने शोककळा पसरली आहे दीपक आणि त्याच्या बहिणीचं नाते अतूट आणि प्रेमळ होतं. मात्र, एका क्षणात घडलेल्या अपघाताने त्यांचं नातं कायमचं तुटलं आहे. ही घटना आपल्याला जीवनाची अनिश्चितता आणि क्षणभंगुरतेची जाणीव करून देत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!