WhatsApp


akola ACB Trap News पेन्शन विभागातील वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना केली अटक जिल्हा परिषद मध्ये खळबळ

अकोला न्युज नेटवर्क

akola ACB Trap News अकोला पंचायत समिती मधील आस्थापना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे निवृत्त झाल्यावरही आर्थिक शोषण करून रक्त पिणारा “रक्तपिपासू” लिपीत आज थोड्या वेळापूर्वीच अकोला एसीबीच्या सापळ्यात अडकला असून आता इतर काही “रगतपिते” सावध झाले असून काही दिवस तरी “झेडपीच्या बाराभाई खटल्यात” कार्यरत कर्मचारी व सामान्य जनतेच्या कामांसाठी कुणी “लाच” मागून “रक्त पिणार” नाही याची खात्री आहे.

अकोला पंचायत समिती मधून काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याची पेन्शन केस तयार करून त्याला त्याचे उर्वरित लाभ देऊन पेन्शन सुरू करण्यासाठी या “रक्तपिपासू बाबूने”akola ACB Trap News लाचेची मागणी केली होती.संबंधित कर्मचाऱ्याने ती देण्याचे मान्यही केले होते,परंतु त्याला पेन्शन संदर्भात भेटायला वा विचारणा करायला गेल्यावर नेहमीच लाचेची रक्कम वाढवून मागितल्या जात असल्याने वैतागून ह्या कर्मचाऱ्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार दाखल केली होती.

अVsar फॅशन अकोला

ह्या तक्रारीच्या अनुषंगाने आकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता ती खरी आढळून आल्याने आज दि.१९/१२/२०२३ ला सापळा कारवाई आयोजित करून ह्या सुरेंद्र ठाकरे नामक “रक्त पिपासू” लिपीकाला १५०० रुपये रक्कमेची लाच स्वीकारत असतांना पंचांसमक्षअकोला पंचायत समितीच्या आवारात रंगेहाथ अटक करण्यात आल्याने केवळ पंचायत समितीच नव्हे तर जिल्हा परिषदेत देखील प्रचंड खळबळ उडाली आहे.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन सावंत व पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांच्या पथकातील संदीप टाले, दिगंबर जाधव,कृष्णा पळसपगार, निलेश शेगोकार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!