WhatsApp


महिलांसाठी AI Alert! फोटोतून कपडे हटवून निर्वस्त्र करणारा AI सोकावतोय, धक्कादायक रिपोर्ट

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

आज काल ज्याच्या कडे सोशल मीडिया अकाउंट नाही तो अगदी मागासलेला म्हटल्या जातो. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग AI Alert आहे प्रत्येक गोष्ट चुटकिणीशी आपल्याला मिळत आहे पण या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत त्या पेक्षा ज्यास्त धोके निर्माण झाले आहेत आणी याला खास बळी पडत आहेत त्या मुली व महिला.

सध्या एआयचा जमाना सुरु झाला आहे. कोणतीही गोष्ट ही चांगल्या वापरासाठी, भल्यासाठी शोधली जाते, परंतू वाईट प्रवृत्ती त्याता वापर वाईटासाठी करतात याचा अनुभव जगाने अनेकदा घेतला आहे. अणु उर्जेचा शोध कशासाठी लावला गेला आणि त्याचा वापर अणुबॉम्ब, अण्वस्त्रांसाठीही झाल्याचे जगाने पाहिलेय, भोगले आहे.

AI चेही तसेच होताना दिसत आहे. एआय हे तंत्रज्ञान उपयुक्त जरी असले तरी त्याचा वापर महिलांना निर्वस्त्र दाखविण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २४ दशलक्ष लोकांना निर्वस्त्र करणाऱ्या वेबसाईटला भेट दिली होती.

ansar fashin add akola

सोशल नेटवर्क अॅनालिसिस कंपनी ‘ग्राफिका’ने यावर एक अहवाल सादर केला आहे. लोकांच्या फोटोतील कपडे काढून टाकून त्यांना निर्वस्त्र दाखविणाऱ्या या एआय वेबसाईट प्रसिद्ध सोशल मीडिया नेटवर्कचा वापर करत आहेत. अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये एक्स आणि रेडीटसह सोशल मीडियावर २४०० टक्क्यांची वाढ झाली आहे. कोणत्याही फोटोला निर्वस्त्र करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे.

यातून धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे अधिकतर साईटवर महिलांविरोधात काम केले जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधही केले जात नाहीएत. डीप फेकने खळबळ उडविलेली असताना एखाद्या महिलेचे नग्न फोटो वापरून वाईट प्रवृत्तीचे लोक काहीही घडवून आणू शकतात, अशी भीती तज्ञांना वाटू लागली आहे.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा पॉर्नोग्राफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एआयच्याच मदतीने हे फोटो शेअर देखील केले जात आहेत. हे एवढे खतरनाक आहे की एखाद्या महिलेची बदनामी अगदी सहजरित्या केली जाऊ शकते. असे असले तरी या एप्सवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाहीय. या अॅप्सची पॉप्य़ुलॅरिटीदेखील यामुळेच वाऱ्याच्या वेगाने वाढू लागली आहे.

कशी घ्याला काळजी काय घ्याल खबरदारी AI Alert

सरकार नियम लावेल तेव्हा लावेल या साईटवर बंदी आणेल तो पर्यंत अधिकतर महिला व युवतींची राख रांगोळी झाली असेल त्या मुळे शक्यतोवर आपण स्वतःच जर याची खबरदारी घेतली तर भविष्यत आपल्याला याचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे शक्यतोवर आपले फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट लॉक करून ठेवा, मान्य आहे तुम्ही जगातले सर्वात सुदंर व्यक्ती आहात त्यामुळे आपल्या सुंदरतेचे प्रदर्शन करून जगाला दाखवायची गरज तरी काय नेमक त्या लाईक शेयर ने साध्य तरी काय होणार? त्या मुळे सोशल मीडियावर आपल्या रिल्स टाकताना योग्य ती घेतली घ्या, व्हाट्सअँप वर शक्यतोवर आपला फोटो न टाकता इतर कोणताही फोटो लावावा, खात्री करूनच फ्रेंड रिक्वेस्ट अस्क्सेप्ट करावी, तरच आपण या धोक्यातून वाचू शकू

सोशल मीडिया वापरा अगदी जपून AI Alert

आज काल रिल्स स्टेट्स व इतर व्हिडिओने जणू युवावर्गाला अगदीच पछाडून टाकले आहे चांगल्या रिल्स फोटो सोबत अश्लील रिल्स व फोटोनची देखील सोशल मीडियावर भरमार पडली आहे विचार करा या ऐआई टूल ने जर तुमच्या फोटो व्हिडीओ सोबत छेडछाड करून काही विकृत कृत्य केले तर तुम्हला ते काय भावात पडेल? त्या पेक्षा आपल्याला न दाखवता देखील तुम्हला असंख्य व्हिडिओ बनवता येतात लक्षात ठेवा सोशल मीडिया हे आभासी जग आहे तुमच्या अकाउंट वर असणारे फॉलोवर्स तुमच्या पोस्ट वर लाईक कमेंट देणारे हेच लोक तुमचा अश्लील व्हिडिओ पाहून तो शेयर करून त्याला पण लाईक कमेंट करतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!