जेलमध्ये टाकलं तर जेलमध्येही मोर्चा काढेन. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ५ मार्च २०२४ :- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर पुन्हा तोफ डागली आहे. राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण जाहीर केले आहे. हे आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुश आहे असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. चार-पाच मराठा आमदार खूष झाले असतील तुम्ही खूश आहात का? असा सवाल उपस्थितांना मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतले टीकणारे आरक्षण हवे होते. दहा टक्क्यांचे आरक्षण घेऊन मला गप्प करायला पाहत होते, परंतू मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. माझी शरीराने मला साथ द्यावी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवितो अशी घोषणा जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

या 10 टक्के आरक्षणात ओबीसींच्या सगळ्या सवलती नाहीत, मग मराठ्यांचा फायदा काय ? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. विधानसेभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा समाज मागास आहे, मग आम्हाला 50 टक्क्यांच्या आता आरक्षण द्यावे. ESBC आरक्षणातील पोरांना अजून नियुक्या दिल्या नाहीत असे जरांगे पाटील यांनी सांगितले. 10 टक्के आरक्षण मला स्वीकारायला लावत होते, पण मी मराठ्यांना माय बाप मानलं आहे. मी कशी गद्दारी करेल असे जरांगे म्हणाले. मी गोरगरीब मराठ्यासाठी काम करतो एसआयटी लाभीत नाही. आपण कसलाही उद्रेक, जाळपोळ करायची नाही. खोटे गुन्हे दाखल केलं तर अंगावर घ्यायचं, पोलीसांचा काही दोष नाही, त्यांना वरुन आदेश आले आहेत असे जरांगे यांनी सांगितले.

मला जेलमध्ये टाकले तरी..
मी पुन्हा हक्क देईल, पुन्हा आपल्याला अंतरवली सराटी येथे एकत्र यावं लागेल. ताकद दाखवायची वेळ आली तर पुन्हा एकदा एकत्र या. मी मुख्यमंत्र्यां सांगितलं की गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही त्याचा लाड केला, उलट मी म्हणतोय आम्ही तुमचा लाड केला. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो असाही टोला जरांगे यांनी लगावला आहे. मुबईमध्ये 36 आमदार एकत्र बसले आणि तिथे अस ठरलं की याला 10 टक्के आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर याला गुंतवा. सरकारने गोडी गुलाबीने आरक्षण द्यावे, आमच्या नादी लागू नये. मला जेलमध्ये टाकले तरी मी जेलमध्ये मोर्चा काढील असे आव्हानच जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!