अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० फेब्रुवारी २१०२४ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची नुकताच पत्रकार परिषद ही पार पडलीये. यावेळी काही महत्वाची माहिती बारावीच्या परीक्षांबाबत देण्यात आलीये. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही पत्रकार परिषद घेतलीये.उद्यापासून संपूर्ण राज्यभरात बारावीच्या परीक्षा या पार पडत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी तब्बल 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी झालीये. म्हणजेच यंदा बारावीची परीक्षा ही 15 लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थी देणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून एक अत्यंत मोठी घोषणा ही करण्यात आलीये. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक दहा मिनिटांचा वेळ वाढून देण्यात आलाय. म्हणजेच काय तर विद्यार्थी हे अतिरिक्त दहा मिनिटे पेपर सोडू शकतात. नुकताच याबाबतची घोषणा ही करण्यात आलीये. परीक्षेच्या वेळ संपल्यानंतरही अतिरिक्त दहा मिनिटे विद्यार्थांना मिळणार आहेत.
बारावीच्या परीक्षेत आता विज्ञान शाखा 7,60,046, कला शाखा 3,81,982, वाणिज्य शाखा 3,29,905, वोकेशनल 37,226, आय टी आय 4750 याप्रमाणे विद्यार्थी हे परीक्षा देतील. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक यांची नियुक्ती देखील मंडळाकडून करण्यात आलीये. काही नंबर देखील मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी देण्यात आलेत.परीक्षेत गैरप्रकार टाळण्याससाठी देखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पाऊले उचलण्यात आलीत. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलीये. जर कोणी गैरप्रकार करताना आढळले तर लगेचच कारवाई ही भरारी पथकाकडून केली जाणार आहे. परीक्षेच्या वेळी देखील भरारी पथकाकडून तपासणी केली जाईल.
सकाळच्या सत्रात 10.30 वाजता आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी 2.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असणे आवश्यक आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी एकून 1, 94, 439 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलीये. विशेष म्हणजे ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरसाठी देखील परवानगी ही देण्यात आलीये.कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्याही यंत्र चालणार नाहीत फक्त कॅल्क्युलेटर वापण्यासाठी परवानगी ही देण्यात आलीये. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असेही शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आव्हान केले गेले आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे हॉलतिकिट विसरले असेल तर तो विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकतो. मात्र, त्याला हमी द्यावी लागणार असल्याचे देखील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलंय.