WhatsApp

१६ जानेवारीला अटलजींना खरी आदरांजली देऊ” —अकोल्यात अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त भाजपचा निर्धार, खासदार अनुप धोत्रे यांचे आवाहन

Share

संपूर्ण देशभरात श्रद्धेय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात यांनी “१६ जानेवारीला आपण अटलजींना, भाऊसाहेब फुंडकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांना खरी आदरांजली द्यायची आहे,” असा स्पष्ट संदेश दिला.



कार्यक्रमाची सुरुवात खासदार अनुप धोत्रे यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने औक्षण करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

प्रास्ताविक भाषणात विजय अग्रवाल यांनी मागील ११ वर्षांत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि अकोल्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. हद्दवाढ, रस्ते, अमृत योजना, भूमिगत गटार योजना, सांस्कृतिक भवन, रुग्णालये, पोलीस वसाहत, राजेश्वर मंदिराचा दर्जा, तहसील कार्यालय आदी कामांमुळे आगामी काळात अकोला महानगरपालिकेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार अनुप धोत्रे यांनी अटलजींच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत सांगितले की, अटलजींनी जवळपास पाच दशकांपर्यंत देशाला दिशा दिली. परराष्ट्र धोरण, अणुसंपन्न भारत, राष्ट्रहिताचे धाडसी निर्णय आणि हिंदुत्वाच्या व्यापक विचारांशी न तडजोड करणारी भूमिका यामुळे अटलजी इतिहासात अजरामर राहतील.

Watch Ad

आमदार रणधीर सावरकर यांनी अटलजींच्या पायाभूत सुविधा, महामार्ग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि अणुचाचण्यांमुळे भारत जागतिक पातळीवर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहिल्याचे नमूद केले. किशोर पाटील यांनीही संसदेत अटलजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीची आठवण करून दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी, येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप व महायुतीच्या नेतृत्वाखाली अकोल्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या विचाराने काम करणारा भाजप कार्यकर्ता हीच अटलजींना खरी आदरांजली ठरेल, असा सूर उपस्थितांनी एकमुखाने व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!