नागपूरमध्ये काल घडलेलं नेमकं काय?दुपारपासून बंद दरवाजामागे बैठका, संध्याकाळपर्यंत धावपळ, आणि रात्री उशिरा अचानक स्पष्ट झालेली विदर्भातील राजकीय गणितं… उपराजधानीत घडलेल्या हालचालींनी एकच प्रश्न निर्माण केला—महानगरपालिका निवडणुकीत विदर्भात महायुतीचं चित्र नेमकं कसं असणार?नगरपरिषद निकालांच्या यशानंतर भाजपच्या होम पिचवर सुरू झालेल्या या गुप्त बैठका फक्त औपचारिक होत्या की आगामी महानगरपालिका रणधुमाळीची नांदी? याच बैठकीत नागपूरसह अकोला, अमरावती आणि चंद्रपूरसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शहरात आणि मुख्यमंत्री यांच्या होम पिचवर झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांतील दमदार कामगिरीनंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विदर्भातील महायुतीचा अंतिम आकार निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील , , आणि या चारही महानगरपालिकांमध्ये आणि महायुतीत एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मात्र या युतीत ची भूमिका शहरनिहाय वेगळी राहणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रपूर आणि अकोला येथे भाजप–शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश राहणार आहे. मात्र नागपूर आणि अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबाहेर राहून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे अधिकच रंजक ठरण्याची चिन्हे आहेत.
या युतीबाबत काल गुरुवारी नागपुरात हालचालींना वेग आला होता. भाजपच्या विदर्भ कार्यालयात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, अमरावती आणि चंद्रपूर येथील भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. दुसरीकडे, आणि यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या चारही शहरांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे झाली.
यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी थेट भाजप कार्यालयात जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली. याच चर्चेत चारही शहरांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीने निवडणूक लढवण्यावर तत्वतः शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करतील आणि त्यातूनच जागावाटप स्पष्ट होईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
एकूणच, विदर्भातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा हा फॉर्म्युला आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात निवडणूक रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.






