राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि यांच्यातील युतीच्या चर्चांनी जोर धरला असताना, अकोला महानगरपालिकेबाबत मात्र अजूनही संभ्रमाचे वातावरण कायम आहे. , आणि येथे युतीसाठी चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे चित्र आहे, पण अकोल्यात मात्र काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव वंचितकडे पोहोचलेला नाही.
नगर परिषद व नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेस-वंचित युतीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. त्यासाठी सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. या चर्चांमध्ये प्रत्येकी ५० टक्के जागावाटपाचा फॉर्म्युला मांडण्यात आला असून, त्यावर सहमती होण्याची दाट शक्यता वंचितच्या विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हाच ५०:५० जागावाटपाचा फॉर्म्युला केंद्रस्थानी असून, भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, अकोला महानगरपालिकेच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून युतीचा कोणताही प्रस्ताव न आल्याने येथे युती होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी स्पष्ट केले की, मुंबई आणि नागपूरमध्ये भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेससोबत युतीसाठी ५० टक्के जागांचा फॉर्म्युला देण्यात आला आहे. “चर्चेतून तोडगा निघाला तर आनंदच आहे. मात्र अकोल्यात अद्याप कोणतीही चर्चा नाही आणि काँग्रेसकडून तसा प्रस्तावही मिळालेला नाही. इतर महानगरपालिकांमध्ये प्रस्ताव आल्यास हाच फॉर्म्युला कायम राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकीकडे राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये काँग्रेस-वंचित युती जवळपास निश्चित होत असताना, दुसरीकडे अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी मात्र राजकीय अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे अकोल्यातील मतदार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष आता पुढील काही दिवसांत होणाऱ्या हालचालींकडे लागले आहे.





