WhatsApp


Akola ACB Trap तक्रारदाराला होमगार्ड ने मागितली २ हजाची लाच, दोन होमगार्ड लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १८ मार्च :- Akola ACB Trap पत्नीच्या नावावरील कोर्टाचे वारंट बजावणी न करता पुढील तारीख वाढून मिळवून देण्यासाठी चक्क होमगार्डने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील १००० हजार रुपये घेतली नाही

मात्र लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री अलकेश रमेशराव सित्रे, वय ४८ वर्ष, पद-होमगार्ड, पोलीस स्टेशन तेल्हारा, गजनकर शाळेच्या पाठीमागे, गजानन नगर, तेल्हारा व किशोर सिताराम वाडेकर, वय-५५ वर्ष, पद होमगार्ड, पोलीस स्टेशन तेल्हारा, रा हनुमान मंदीराजवळ, साईनगर, ता.तेल्हारा, असे अटक करण्यात आलेल्या होमगार्ड आरोपींची नावे आहेत.

अकोल्यातील अॅन्टी करप्शन ब्युरोने आज एका धक्कादायक कारवाईत एका होमगार्ड कर्मचाऱ्याला लाचेच्या स्वीकारासाठी अटक केली आहे. आरोपी होमगार्ड कर्मचारी अलकेश सित्रे यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावरील कोर्टाचे वारंट बजावणी न करता पुढील तारीख वाढून मिळवून देण्यासाठी २००० रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराच्या पत्नीने मातोश्री नागरी सह पतसंस्था तेल्हारा मर्या या संस्थेकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी 35 हजार रुपये कर्ज देऊन 15 हजार रुपये डिपॉझिट म्हणून ठेवून घेतले गेले होते. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाचा चेक जमानत म्हणून दिला होता. कर्जाचा भरणा चेकद्वारे झाल्याने तक्रारदाराच्या पत्नीविरुध्द तेल्हारा कोर्टात कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्स झाल्याबाबत दावा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आरोपी होमगार्ड कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर आज 18 मार्च 2024 रोजी सापळा कारवाई करण्यात आली. सापळा कारवाईत आरोपी होमगार्ड कर्मचारी किशोर वाडेकर यांनी तक्रारदाराकडून 1000 रुपये लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागण्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार, अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती आणि पोलीस उपाधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, किशोर पवार आणि चालक सलीम खान यांनी केली आहे.

होमगार्ड’ हा कोणाचा वसूलदार तर नाही ना? Akola ACB Trap

कोर्टाचे वारंट बजावणी न करता पुढील तारीख वाढून मिळवून देण्यासाठी मदत करतो, साहेबांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणून होमगार्डने मध्यस्थीची भूमिका निभावली. पण, तक्रारदाराने त्यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. सोमवारी रात्रीच्या 9 वाजताच्या सुमारास लाचलुचपतचे अधिकारी महाराजा श्री. अग्रेसन टॉवर चौक, परिसरात दबा धरून बसले होते. त्याचा काहीच अंदाज त्या होमगार्डला आला नाही. १००० हजारांची लाच दिली असता स्वीकारली नाही. परंतु, होमगार्ड गुन्ह्या पर्यंत पोहचलाच कसा?, त्या तक्रारदाराबद्दल माहिती कशी मिळाली, तक्रारदाराला कडून पैसे घेतले असते तर ते नेमके कोणाला देणार होता? होमगार्ड कोणाचा वसूलदार आहे, किंवा त्याने या आधी पण असे काम केले असतील असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.?

अॅन्टी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला येथील खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

मोबाईल क. श्री शैलेश सपकाळ पोलीस उपाधिक्षक-९८२२२२९५३१
श्री नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक-९१३००१९०७७
श्री सचिन सावंत पोलीस निरीक्षक- ८८५५८३०८३०

Leave a Comment

error: Content is protected !!