WhatsApp

MPSC schedule change एमपीएससीचा मोठा निर्णय! 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा जाहीर

Share

महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 21 डिसेंबरला होणारी एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आयोगाने सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे, तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी या नवीन तारखांची नोंद घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.



आधी ही परीक्षा 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळात नियोजित होती. पण याच दिवशी नगर परिषद आणि नगर पंचायती निवडणुकांच्या मतमोजणीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असल्याने समस्या निर्माण झाली. मतमोजणी आणि परीक्षा दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांकडून यासंदर्भात माहिती मागवण्यात आली.

काही जिल्ह्यांनी सांगितले की परीक्षा केंद्राजवळच मतमोजणीची ठिकाणे आहेत. लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, आणि परीक्षेसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता अशा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. या कारणांमुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

एमपीएससीने स्पष्ट केले की उमेदवारांसाठी सुरळीत परीक्षा वातावरण तयार करणे हे प्राथमिक निकष आहे. त्यामुळे निवडणुकीच्या गोंधळात परीक्षा घेणे टाळण्यात आले. आता उमेदवारांना नवीन तारखांनुसार तयारीचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!