WhatsApp

अकोल्यात निवडणूक रिंगणात थरार!एमआयएम उमेदवाराच्या नवऱ्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १डिसेंबर २०२५:अकोटमधील निवडणूक रणधुमाळी तापली असतानाच पहाटेच धडकी भरवणारी घटना घडली. नगरपालिका प्रभाग 15 मधील एमआयएमच्या उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या नवऱ्यावर मॉर्निंग वॉकदरम्यान तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. राजकीय वातावरण आधीच तापलेलं, त्यात हा हल्ला जणू अंगणात वीज कोसळावी तसा पडला.



मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तेलगोटे सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारून घरी परतत होते. त्याच वेळी तीन जणांनी त्यांचा पत्ता घेत, वारंवार वार करत त्यांना गंभीर जखमी केले. डोक्यावर खोल जखम झाल्याने त्यांना तातडीनं अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

घटनेची खबर कळताच तेलगोटे समर्थकांची रुग्णालयात एकच गर्दी उसळली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा तपास सुरू केला. हल्ल्यामागे राजकीय वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आजच प्रचाराचा शेवटचा दिवस. सकाळच्या पहिल्या तासातच घडलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिसांची धावपळ, कार्यकर्त्यांची चर्चा आणि शहरभर निर्माण झालेली खळबळ…
अकोल्यातील निवडणूक तापलेली नव्हतीच, पण या घटनेने जणू अंगारात पेट्रोल ओतल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!