अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १५ मार्च :- जगभरातील अनेक लोक WhatsApp चा वापर करतात. आपल्या युजर्सला कायम खिळवून ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅ आपल्या अॅपमध्ये नवनवीन अपडेट करत असतात. जेणेकरुन वापरकर्त्यांना सर्व सुविधा मिळतील आणि वापरणं सोयीस्कर होईल. त्यामुळे सतत काही ना काही अपडेट व्हॉट्सअॅ करत असतं. अशातच आणखी एक नवं अपडेट समोर आलंय ज्याविषयी जाणून तुम्हीही चकित व्हाल.
WhatsApp युजर्सच्या प्रायव्हसीची गोष्ट लक्षात घेऊन हे नवं फीचर अपडेट आलं आहे. आता नव्या अपडेट नुसार व्हॉट्सअॅ प्रोफाईलचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येणार नाही. जर तुम्ही स्क्रीनशॉट काढण्याचा प्रयत्न केला तर त्या युजरला स्क्रीनशॉट काढण्यापासून ब्लॉक केलं जाईल.
व्हॉट्सअॅनं नवं फीचर बिटा वर्जन मागील महिन्यात रिलीज केलं होतं. आता हळूहळू या फीचरला कंपनीनं रोल आऊट करणं सुरु केलंय. WabetaInfo च्या रिपोर्टनुसार, फेब्रुवारी महिन्यात या फीचर अपडेटवर कंपनी टेस्टींग करत आहे. आता कंपनीनं या नव्या फीचरला सगळ्या मोबाईलमध्ये अपडेट करायला सुरुवात केलीय. असून तुमच्या मोबाईल वर देखील ही सुविधा जारी केली असेल.
आता कोणीही मित्र-मैत्रिणींच्या डीपीचा म्हणजेच प्रोफाईलचा स्क्रीनशॉट घेतला ते ब्लॅक फोटो सेव्ह होणार. फीचर टेस्टिंग दरम्यान ज्यांनी स्क्रिनशॉट घेतले त्यांना एक नोटीफिकेशन आलं. ज्यावर लिहिलं होतं की, रेस्ट्रीक्शनमुळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही.