WhatsApp

Akola जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर! महिलांना मोठी संधी, बदलणार राजकीय गणितं

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो | दिनांक – १३ ऑक्टोबर २०२५अकोला जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा महत्वाचा टप्पा आज पूर्ण झाला आहे. १३ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्हा नियोजन भवनात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.



🔹 एकूण ५२ मतदारसंघांसाठी आरक्षण जाहीर

अकोला जिल्ह्यातील एकूण ५२ जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), महिला व खुला (OPEN) गट अशा पद्धतीने जागांचे वितरण करण्यात आले.
या वेळी महिला आरक्षणाचा वाटा मोठा असल्याने जिल्ह्यातील अनेक सर्कलमध्ये नवीन महिला नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे.

सर्कलनिहाय आरक्षण तपशील

Watch Ad

कुरणखेड – OBC

कानशिवणी – SC (महिला)

बाभूळगाव – SC

चिखलगाव – OPEN (महिला)

बोरगाव मंजू – OBC (महिला)

आगर – OBC

उगवा – ST (महिला)

चांदूर – OBC

दहीहंडा – SC (महिला)

राजंदा – OBC (महिला)

दगडपारवा – OPEN (महिला)

जाम वसु – OPEN

पिंजर – OPEN (महिला)

महान – OPEN

कान्हेरी सरप – OBC (महिला)

सिरसो – SC

शेलू बाजार – SC

माणा – OPEN (महिला)

कुरुम – OPEN

कानडी – SC (महिला)

हातगाव – OBC (महिला)

लाखपुरी – SC

दानापूर – OPEN (महिला)

अडगाव – ST

हातरून – OBC

भांबेरी – OPEN

दहिगांव – OPEN

बेलखेड – OPEN (महिला)

पाथर्डी – OPEN

वडाळी देशमुख – OPEN (महिला)

अकोलखेड – ST (महिला)

वरुळ – OBC (महिला)

मुंडगाव – OBC (महिला)

कुटासा – OPEN

अकोली जहा – ST (महिला)

चोहोट्टा – OPEN (महिला)

उमरा – OBC

शिर्ला – SC (महिला)

विवरा – OPEN

सस्ती – OBC

आलेगाव – OPEN (महिला)

चोंडी – ST

पिंपळखुटा – OBC

व्याळा – OPEN

देगाव – SC

पारस – OPEN

अंदुरा – SC (महिला)

लोहारा – OPEN

निमकर्दा – SC (महिला)

वाडेगाव – OBC

महिलांना मोठी संधी

या आरक्षण सोडतीत सुमारे अर्ध्याहून अधिक सर्कल महिला उमेदवारांसाठी राखीव असल्याने स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, या आरक्षणामुळे अनेक नवीन महिला चेहऱ्यांना संधी मिळेल आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेली पुरुषसत्ताक निवडणूक समीकरणे बदलू शकतात.

राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

अकोला जिल्हा परिषदेत मागील काही काळ वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव राहिला आहे. मात्र या वेळी परिस्थिती वेगळी आहे.
जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), दोन्ही शिवसेना गट तसेच मनसे अशी बहुपक्षीय लढत अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीनंतर पक्षांतर्गत उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी नवीन समीकरणे जुळण्याची चिन्हे दिसत आहेत.

गावागावात राजकीय चर्चा रंगल्या

आरक्षण सोडतीनंतर जिल्हाभरात कार्यकर्त्यांच्या बैठका, चर्चा आणि भेटीगाठींना वेग आला आहे. काही सर्कलमध्ये महिला आरक्षणामुळे विद्यमान पुरुष नेत्यांचे गणित बदलले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पक्षांतर्गत उमेदवारीवरून मतभेद वाढण्याची शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

राजकीय नेत्यांसाठी आता खरी धावपळ सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उमेदवार निवड प्रक्रिया, तिकीट वाटप, प्रचाराची रणनीती यावर लक्ष केंद्रित होईल.
अकोला जिल्ह्यातील ५२ सर्कलपैकी कोणाच्या झेंड्याखाली जिल्हा परिषद स्थापन होणार, हे ठरवणारी ही निवडणूक अत्यंत रोमांचक ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!