WhatsApp

लाडकी बहीण योजना eKYC संकटात! OTP एररमुळे महिलांची झोप उडाली, पण सरकारचा दिलासा – हप्ता थांबणार नाही!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ८ ऑक्टोबर २०२५:राज्यातील महिलांसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या eKYC प्रक्रियेच्या कचाट्यात सापडली आहे. तांत्रिक अडचणींमुळे OTP न येणे, सर्व्हर डाऊन होणे आणि पडताळणी प्रक्रियेत अडथळे येणे या समस्यांमुळे लाखो लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. दिवसभर आणि रात्रभर मोबाईल हातात घेऊन OTP च्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांची अवस्था अगदी चिंताजनक झाली आहे.



गेल्या काही दिवसांत राज्यभरातील सीएससी केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कारण शासनाने eKYC करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली असली तरी, महिलांना भीती वाटतेय की प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास त्यांचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता थांबेल का?

महिलांचा प्रश्न – हप्ता थांबणार का?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. पण eKYC पडताळणी प्रक्रियेत OTP एररमुळे अनेकांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे “आपल्याला पुढचा हप्ता मिळेल का?” हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात घर करून बसला आहे.

Watch Ad

अनेक महिलांनी रात्रभर प्रयत्न करूनही OTP न आल्याने eKYC पूर्ण होऊ शकले नाही. काहींनी बँक आणि आधार केंद्रांची धाव घेतली, तरीही समस्या कायम आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर “eKYC न झाल्यास हप्ता थांबवणार का?” या चर्चेला उधाण आले आहे.

शासनाचा खुलासा – हप्ता थांबवण्याचा निर्णय नाही

महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते थांबवले जाणार नाहीत. eKYC प्रक्रियेसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे आणि त्या कालावधीत सर्व लाभार्थींना पडताळणी पूर्ण करण्याची संधी आहे.

याचा अर्थ असा की, या दोन महिन्यांतील हप्त्यांचे वितरण सुरू राहील. मात्र, जर नोव्हेंबरपर्यंत eKYC पूर्ण झाले नाही, तर पुढील हप्ते थांबवण्याचा विचार केला जाऊ शकतो. म्हणजेच, सरकारने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दिवाळीपूर्वी सरकारचा दिलासा अपेक्षित

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिले होते. त्या वेळी महिलांना ४५०० रुपये मिळाले आणि राज्यभरातील घरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हा निर्णय महिलांच्या दृष्टीने फायदेशीर ठरला होता.

यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे, सरकार महिलांना नाराज करणार नाही, अशी चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी पुन्हा एकदा सरकारकडून दिलासा मिळू शकतो, अशी महिलांची अपेक्षा आहे.


अदिती तटकरे यांचे विधान – “तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू”

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेत OTP संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत. लवकरच ही अडचण दूर होईल आणि eKYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर बनेल.”त्यामुळे सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट झाले आह

महिलांच्या भावना – “OTP न मिळाल्याने बेचैनी वाढली”

अकोला, अकोट, बार्शी टाकळी, पातूर, मूर्तिजापूर, आणि बालापूर तालुक्यातील अनेक महिलांनी सांगितले की, OTP न मिळाल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. काही महिलांनी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा अयशस्वी झाल्याचे सांगितले. “OTP यायला तासभर लागतो, कधी-कधी तर दुसऱ्या दिवशी येतो,

काही महिलांनी मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्क समस्यांबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काही जणांनी आधार केंद्रांवरून थेट eKYC करण्याचा पर्याय निवडला आहे.

तांत्रिक त्रुटी लवकरच दूर होऊ शकतात

तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, मोठ्या प्रमाणात eKYC प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाल्याने सर्व्हरवर ताण वाढला आहे. OTP डिलिव्हरीमध्ये उशीर होत आहे. “अशा समस्या तात्पुरत्या असतात आणि पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारेल,” असे तज्ज्ञ सांगतात.

सध्या राज्यभरात लाडकी बहीण योजना eKYC प्रक्रियेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. महिलांनी घाबरून न जाता, दिलेल्या मुदतीत eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता थांबवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी शांतपणे प्रक्रिया पूर्ण करावी आणि OTP समस्या दूर होण्याची प्रतीक्षा करावी, एवढंच या क्षणी महत्त्वाचं आहे.

लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे काही प्रमाणात गैरसोय झाली असली, तरी सरकारने महिलांच्या बाजूने स्पष्ट संकेत दिले आहेत. OTP आणि सर्व्हर समस्या लवकरच दूर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महिलांनी संयम

Leave a Comment

error: Content is protected !!