Finance Horoscope Today 29 September 2025 In Marathi : मेष, वृषभ, मिथुनसह या राशींसाठी दिव सकारात्मक असून धनलाभाचे योग आहेत. वृश्चिकसह या राशींसाठी करिअरमध्ये उत्तम प्रगती आहे. मकरसह या राशीचे जातकांचा मानसन्मान वाढेल तसेच प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होतील. तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते सविस्तरपणे पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य – नोकरीमधील बदल सकारात्मक :- आजचा दिवस मेष राशीसाठी ठीक आहे. नोकरी आणि व्यवसायात काही बदल होणार आहेत ते तुम्ही सकारात्मक आहेत असे समजा. या बदलामुळे तुमचे सहकारी थोडे नाराज होऊ शकतात. तुम्हाला इतरांना मदत केल्याने समाधान मिळते, त्यामुळे आजचा दिवस परोपकारात जाणार आहे. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सगळीकडे तुमचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण रात्री जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. आर्थिक खर्च वाढू शकतो.
वृषभ आर्थिक राशिभविष्य – प्रत्येक कामात नाशिकची साथ :- आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात व्यतीत करणार आहात. प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. करिअर संदर्भात चांगली बातमी मिळणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होतात ती तुम्हाला मिळेल. जे लोक नवीन नोकरीमध्ये लागले आहेत त्यांना हुशारी आणि कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळेल. तब्येतीबद्दल सावध राहा. कामाचा अती ताण तुमच्या उत्साहावर परिणाम करु शकतो.
मिथुन आर्थिक राशिभविष्य – धनसंपत्ती वाढण्याचे योग :- आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. घरातील वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे. तुमची धनसंपत्ती वाढण्याचे योग आहेत. कामात खूप व्यस्त राहणार आहात. दरम्यान अनावश्यक खर्च टाळा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात नियोजनाकडे कटाक्षाने लक्ष द्या म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील.

कर्क आर्थिक राशिभविष्य – धनलाभाचा योग :- अचानक धनलाभाचा योग असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. त्यामुळे व्यवसायातील काम अधिक वाढेल. तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापन याकडे लक्ष द्या. घाईघाईने आणि भावनिकतेत घेतलेला निर्णय पुढे पश्चातापाचे कारण बनू शकतो. आज निर्णय घेताना त्याचा सखोल विचार करा. कोणतीही घाई करु नका. नोकरीत सहकारी कामात मदत करतील त्यामुळे प्रोजेक्ट पटापट मार्गी लागेल.
सिंह आर्थिक राशिभविष्य – स्पर्धा परीक्षेत उत्तम यश:- सिंह राशीचे जे जातक राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना अनपेक्षित यश मिळेल. मुलांबाबतच्या जबाबदाऱ्याही पूर्ण होतील. कोणती स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची काही कामे खूप दिवसांपासून थांबलेली होती त्यात तुम्हाला यश मिळेल. आज थोडी दगदग असल्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो. डोळ्यांचे आजार डोके वर काढतील त्वरित तपासणी करा. खाण्यापिण्यावर विशेष नियंत्रण ठेवा.
कन्या आर्थिक राशिभविष्य – रागावर नियंत्रण ठेवा :- आज व्यवसायासाठी चांगला दिवस आहे एखादी नवीन डिल होवू शकते. तुम्ही कागदपत्रे तयार ठेवा त्यामुळे धावपळ होणार नाही. क्रिएटीव्ह कामात तुम्हाला उत्तम यश मिळेल. ऑफिस किंवा घरात समजा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी कामे आज पटापट मार्गी लागतील. संध्याकाळी धनलाभाचा योग आहेत
तुळ आर्थिक राशिभविष्य – मिळकतीचे नवीन मार्ग खुले होणार :- आज तुमच्याभोवती आनंद, सुख समाधान घेवून येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेले मोठी आर्थिक व्यवहार आज व्यवस्थित पार पडतील. हातात मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचा आनंद तुम्हाला होईल तसेच गुंतवणुकिचे प्लॅन करणार आहात. जवळच्या आणि दूरच्या प्रवासाच्या योजना आखणार असून प्रवासात यश आहे. लवलाईफ उत्तम असून नाते अधिक दृढ होईल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य – व्यावसायिक डिल होणार :- आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. कोणताही महत्त्वाचा व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होईल आणि तुम्हाला एक मोठे प्रोजेक्ट मिळेल. आज तुम्ही तुमचे बोलणे इतरांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालात, तर कामे पटापट मार्गी लागतील. तब्येतीची काळजी घ्या, डॉक्टरांनी काही
धनु आर्थिक राशिभविष्य – विरोधक कौतुक करतील :- आज तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी पाहत विरोधकही तुमची प्रशंसा करतील. राजकारणातील लोकांशी असणारा संबंध तुमच्यासाठी लाभाचा ठरेल. तुमचे थांबलेले काम पूर्ण होईल. सासरकडून तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. संध्याकाळी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. काही खास लोकांच्या भेटी होतील त्यामुळे भविष्यात मोठा फायदा आहे.
मकर आर्थिक राशिभविष्य – काम वेगात पूर्ण होणार :- तुमच्यासाठी दिवस उत्तम असून तुम्ही जे काही काम हातात घेणार आहात ते पार पाडणार आहात. तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. मिळकतीच्या क्षेत्रात तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यात प्रगती होईल. कनिष्ठांकडून भरपूर आदर आणि पाठिंबा मिळेल. आज कोणत्याही वादविवादात अडकू नका. रात्री पाहुण्यांचे आगमन होईल त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य :- तुमच्यासाठी दिवस चांगला असून तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचे पेमेंट रखडलेले असेल तर ते मिळणार आहे. तब्येतीची काळजी घ्या तसेच वादात पडू नका, अन्यथा मानसिक त्रास होवू शकतो. निराशाजनक बातमीमुळे तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो, सावध राहा आणि प्रवासात स्वतःची काळजी घ्या. आज रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे.
मीन आर्थिक राशिभविष्य – प्रवासात खर्च वाढणार :- आजचा दिवस मुलांची काळजी घेण्यात जाणार आहे खास करून मोठ्या मुलाची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल. काम खूप वाढल्यामुळे टेन्शन येईल. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळापासूनचा सुरु असणारा वाद कमी होईल. माहेरच्या मंडळींसोबत व्यवहार करणे टाळा, तसेच नाते संबंध अधिक ताणले जातील तेव्हा काळजी घ्या. धार्मिक स्थळांचा प्रवास करणार असून खर्च वाढवू शकतो. प्रवास करताना सावधगिरी बाळगा.