Today Horoscope 27 September 2025 : आजचे राशिभविष्य 27 सप्टेंबर 2025 : आज शनिवारी कन्या राशीत सूर्य-बुध युतीने बुधादित्य योग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे व्यक्तीला बुद्धिमत्ता, कौशल्ये व समाजात आदर मिळतो. हा योग सर्व राशींना शुभ फल देणारा ठरेल.
आजच्या दिवशी काही राशींना आर्थिक लाभ होईल. मेष राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. तुळ व वृश्चिक राशींना फायदेशीर संधी मिळतील. कर्क व सिंह राशीचे लोक कलात्मक कामात सक्रिय राहतील. कन्या राशीने संयम बाळगणे आवश्यक आहे. धनु व मकर राशींसाठी नवीन भागीदारी लाभदायक ठरेल. पहा मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य…
मेष :
तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. पण त्यातून मार्ग काढण्याची कला तुम्हाला शिकावी लागेल. त्यामुळे तुमची कामं मार्गी लागतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज रात्री तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान वाढवण्याची गरज आहे.
वृषभ :
आज तुम्हाला लोकांकडून शांतपणे काम करून घ्यावं लागेल. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत तुम्हाला पद आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तुमचा जीवनसाथी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल त्यामुळे तुमच्या मनात प्रेम राहील. रात्री काही वाईट लोकांशी भेट झाल्यास त्रास होऊ शकतो त्यामुळे सावध राहा. भावंडांशी संबंध चांगले राहतील.
मिथुन :
आज तुम्हाला सावध राहावं लागेल. तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या व्यवसायात मित्रांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्या मुलांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यात त्यांना यश मिळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज रात्री तुम्ही एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.
कर्क :
जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी प्रवास करावा लागला तर नक्की करा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. मुलांची जबाबदारी पूर्ण होईल. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत प्रेमळ गोष्टी कराल. संध्याकाळी तुम्हाला एखाद्या आवडत्या व्यक्तीचची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. आज तुमचं तुमच्या आईसोबत थोडं भांडण होऊ शकतं त्यामुळे जपून बोला.
सिंह :
तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मान-सन्मान मिळेल. त्यामुळे तुमच्या शत्रूंना त्रास होईल पण तुम्हाला त्यांची काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमचं सामर्थ्य पाहून ते शांत होतील. शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामात आणि विद्यार्थ्यांच्या कर्तव्यपालनात यश मिळेल. आज तुम्हाला थोडी जास्त धावपळ करावी लागेल. तुम्हाला डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आज संध्याकाळी शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो.
कन्या :
आज तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात पैसे खर्च करू शकता. त्यामुळे तुमच्या प्रसिद्धीत वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. मुलांना धार्मिक कामं करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. दुपारनंतर कोर्ट-कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळू शकतं. आज तुम्ही एखाद्या महिलेला तिच्या कामात मदत करू शकता.
तूळ :
आज तुमच्या कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण राहील. घरातील सगळ्या लोकांना आनंद होईल. तुमच्या हातात पुरेसा पैसा असेल. त्यामुळे तुमचे रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. प्रेमसंबंध वाढतील. आज तुम्हाला तुमच्या आईच्या भविष्याची चिंता वाटू शकते. आज संध्याकाळी जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे बेत रद्द होऊ शकतात.
वृश्चिक :
आजचा दिवस तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. तुम्हाला काही शारीरिक त्रास होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आणि तपासण्या करण्यात वेळ घालवाल. शारीरिक त्रासामुळे तुम्हाला जास्त चालावं लागेल. विश्रांतीकडे लक्ष द्या. तुमच्या भावाचा सल्ला तुमच्या कौटुंबिक व्यवसायासाठी उपयोगी ठरू शकतो.
धनु :
पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून पैसे मिळू शकतात. तुमच्या कौटुंबिक व्यवसायात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे विरोधकसुद्धा तुमची स्तुती करतील. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. आज तुमच्या जीवनसाथीसोबत वाद होऊ शकतो त्यामुळे सावध राहा.

मकर :
आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. आज संध्याकाळी कोणत्याही वादात पडू नका, नाहीतर ते प्रकरण कोर्टात जाऊ शकतं. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळेल त्यामुळे तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल.
कुंभ :
तुम्हाला अचानक बातमी ऐकून प्रवासाला जावं लागू शकतं त्यामुळे तयार राहा आणि कोणाशीही भांडण करू नका. तुमच्या आरोग्यात आणि आनंदात काही अडचणी येऊ शकतात पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या जीवनसाथीचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. जर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.
मीन :
तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. सासरच्या लोकांशी कोणताही व्यवहार करू नका नाहीतर संबंध बिघडू शकतात. धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी आणि धर्मादाय कार्यासाठी खर्च होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या मुलांच्या काळजीमध्ये जाईल.