WhatsApp

आजचे राशिभविष्य 18 सप्टेंबर 2025 : गौरी योगामुळे बदलणार नशिब, भगवान विष्णू देतील आर्थिक लाभ ! जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल !

Share

आजचे राशिभविष्य 18 सप्टेंबर 2025



आज 18 सप्टेंबर, गुरुवारचा दिवस खास आहे. आज गौरी योग जुळला असून या योगामुळे भगवान विष्णूंची कृपा काही राशींवर राहणार आहे. विशेषतः मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होईल.कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येऊ शकतात. पैशाच्या बाबतीत लाभ होईल. ऑफिसमध्ये नवे प्रोजेक्ट मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये आनंद वाढेल.

चला तर मग जाणून घेऊया, मेष ते मीन राशीपर्यंत तुमचा आजचा दिवस कसा असेल…

मेष

आज कुटुंबातील आरोग्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबतचे संबंध अधिक गोड होतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. बिझनेसच्या समस्या दूर होतील, प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत यश मिळेल. मात्र आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहू शकते.

👉 भाग्य : 84% | 🪔 उपाय : लक्ष्मी मातेला खीरचा नैवेद्य द्या.

वृष

भमुलांच्या भविष्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल, त्यामुळे घरात आनंद निर्माण होईल. भावंडांशी संबंध सुधारतील. नोकरीच्या संधी मिळतील. बोलताना संयम ठेवा. आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.👉 भाग्य : 96% | 🪔 उपाय : तुळशीला पाणी अर्पण करून दिवा लावा.

मिथुन

विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सहकार्य मिळेल. कुटुंबाची जबाबदारी पूर्ण होईल. व्यवसायाला आधार मिळेल. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

👉 भाग्य : 83% | 🪔 उपाय : शिवजप माळ वाचा.

कर्क

पार्टनरशिप व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तुमच्या बोलण्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. सासरकडून फायदा मिळेल. बाहेरचे खाणे टाळा. मुलांसोबत आनंदात वेळ जाईल. गुंतवणूक टाळा.

👉 भाग्य : 92% | 🪔 उपाय : गरजूंना तांदूळ दान करा.

सिंह

अडकलेले पैसे परत मिळतील. अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायात वडिलांचा आधार मिळेल. नोकरीत अडचणी दूर होतील. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. जोडीदाराचा सपोर्ट मिळेल. धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.

👉 भाग्य : 71% | 🪔 उपाय : योगा आणि प्राणायाम करा.

कन्या

अनोळखी व्यक्तीशी भेट होऊ शकते. राजकारणात फायदा होईल. कामावर आदर मिळेल. आर्थिक स्थितीत समतोल ठेवा, नाहीतर त्रास होईल. प्रेमसंबंधात तणाव येऊ शकतो. मुलांशी संबंधित वाद सुटेल.

👉 भाग्य : 62% | 🪔 उपाय : पहिली चपाती गायीला खाऊ घाला.

तूळ

आयुष्यात गोडवा येईल. जोडीदाराचा आधार मिळेल. खर्च वाढेल पण नोकरीत यश मिळेल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील. समाजात आदर मिळेल. मित्रांना मदत कराल.

👉 भाग्य : 83% | 🪔 उपाय : कृष्णाला लोणी-मिश्रीचा नैवेद्य दाखवा.

वृश्चिक

कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे. जोडीदाराचा पूर्ण सपोर्ट मिळेल. विदेश व्यापारात लाभ मिळेल. मालमत्तेशी संबंधित वाद संभवतात. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

👉 भाग्य : 64% | 🪔 उपाय : पांढऱ्या वस्तूचे दान करा.

धनु

जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. संपत्तीत वाढ होईल. संध्याकाळी देवदर्शनाचा योग आहे.

👉 भाग्य : 91% | 🪔 उपाय : सरस्वती मातेची पूजा करा.

मकर

सासरकडून लाभ मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना मदत मिळेल. भाऊ-बहिणींसोबत आनंदी वेळ जाईल. व्यवसायाची प्रतिमा सुधारेल. मित्रांकडून मदत होईल.

👉 भाग्य : 90% | 🪔 उपाय : शिव चालीसा वाचा.

कुंभ

व्यवसायात नवे करार होतील. बोलण्यात संयम ठेवा. आरोग्य सांभाळा. नोकरीत यश मिळेल. राजकीय सहकार्य मिळेल. संध्याकाळी कुटुंबातील ज्येष्ठांसोबत चर्चा होईल.

👉 भाग्य : 81% | 🪔 उपाय : गणपती बाप्पाला लाडूचा नैवेद्य दाखवा.

मीन

कामावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात. वाहन जपून चालवा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याचा दिवस आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.

👉 भाग्य : 77% | 🪔 उपाय : गुरुजनांचा आशीर्वाद घ्या.


Leave a Comment

error: Content is protected !!