WhatsApp

दिवाळीतही रेनकोट घालावा लागणार? राज्यात पाऊस कधीपर्यंत सक्रीय ? हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १७ सप्टेंबर २०२५ :- गेल्या काही दिवसांपासून उघडलेल्या पावसाने कालपासून राज्यभरात पुन्हा धूमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून आणखी काही दिवस हे चित्र असंच राहणार असल्याचं दिसतंय.



आर्थिक राजधानी मुंबईत आजही ढगाळच वातावरण असून ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसायला सुरूवात पुन्हा झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची मात्र चांगलची त्रेधातिरपीट उडाली आहे. गणपती विसर्जनानंतर काही दिवस पाऊस उघडला होता, वातावरणातही गरमी जाणवू लागली होती.

दिवाळीतही पडणार पाऊस ?

मात्र आता राज्यभरात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला असून महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी यांसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसलं. त्यातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे लोकांची डोकेदुखी वाढू शकते. खरंतर बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यातच हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे की यंदा नवरात्र, दसरा दिवाळीपर्यंत पाऊस होऊ शकतो. यामुळे नागरिक धास्तावले असून सणांच्या काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास सगळंच विस्कळीत होऊ शकतं.

यलो अलर्ट, रेड अलर्ट कुठे ?

दरम्यान मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये काही भागांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत महत्वाचं काम असेल, गरज असेल तरच बाहेर पडा असंही नागरिकांना सांगण्यात आलं आहे.

ऑरेंज अलर्ट – रायगड, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर घाटमाथा, या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहमदनगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती. नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!