Today Horoscope 16 September 2025 : आज 16 सप्टेंबर मंगळवार रोजी शुक्रादित्य योगाचा प्रभाव दिसून येणार आहे. हा योग खूपच खास आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. विशेषत: भगवान हनुमान ५ राशींना खूप लाभ देणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढेल. त्यांच्या कामाच्या ठिकाणी अधिकार वाढतील. कामात येणारे अडथळे आणि अडचणी दूर होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक बाबतीत सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. चला मग बघूया मेष ते मीन राशीपर्यंत तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल. जाणून घ्या, काय लिहिलेय तुमच्या आजच्या राशिभविष्यात…
आजचे राशिभविष्य 16 सप्टेंबर 2025 : शुक्रादित्य योगाने या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल !
मेष : आज कामाच्या ठिकाणी जास्त अपेक्षा ठेवू नका. स्वतःच्या हिंमतीवर काम करा. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. व्यावसायिक निर्णय घेताना विचारपूर्वक काम करा. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घरात काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता.आज तुमचे भाग्य 95% तुमच्या बाजूने आहे. शनिदेवाला तेल अर्पण करा आणि दर्शन घ्या.
मिथुन : आज गैरसमजामुळे तुमच्या प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. नात्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. वाईट गोष्टींपासून दूर राहा. समाजात तुमची प्रतिमा जपा. विद्यार्थ्यांना ध्येय मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. अनुभवातून शिका आणि पुढे जा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.आज तुमचे भाग्य 76% तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.
वृषभ : आज तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे तुमचे काम व्यवस्थित होईल. आर्थिक बाबतीत नशीब तुमच्या सोबत असेल. तुमचा व्यवसाय वाढेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडतील. प्रेम जीवनात तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही फिरायला जाऊ शकता. जुने कर्ज फेडले जाईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमचे भाऊ-बहीण तुम्हाला प्रेम देतील.आज तुमचे भाग्य 91% तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा टिळा लावा.
कर्क : आज तुम्ही तरुणांना कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन द्याल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. व्यवसायासाठी योजना बनवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत मजेत वेळ घालवा.आज तुमचे भाग्य 97% तुमच्या बाजूने असेल. माता पार्वतीची पूजा करा.
सिंह : आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकता. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबातील सदस्य आणि मुले तुमच्याकडे गिफ्ट मागू शकतात ते तुम्ही आनंदाने द्याल. लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा. आळस सोडा आणि यश मिळवा. नशीब तुम्हाला साथ देईल.आज तुमचे भाग्य 91% तुमच्या बाजूने असेल. गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा.
कन्या : विद्यार्थ्यांना भविष्यातील निर्णय घेण्यासाठी शिक्षक आणि कुटुंबाची मदत मिळेल. तुमच्या व्यवसायात बदल होतील आणि नवीन संधी मिळतील. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. प्रेम व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवेल. जे नोकरी शोधत आहेत त्यांचे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.आज तुमचे भाग्य 79% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा.
तूळ : आज अनावश्यक खर्च टाळा. नशीब साथ देणार नाही त्यामुळे संयमाने अडचणी दूर करा. कामावर लक्ष केंद्रित करा नाहीतर तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात. व्यावसायिक प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला आराम वाटेल. तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. नवीन संधींसाठी तयार राहा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मुलांबद्दल थोडी चिंता वाटू शकते. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल.आज तुमचे भाग्य 82% तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालीसा वाचा.
वृश्चिक : अडचणीतून मार्ग मिळेलआज कोणतेही काम करण्यासाठी वेळ शुभ आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल. प्रेम जीवनात आनंद राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याचा विचार कराल. व्यावसायिक जीवनात उत्साहाने काम करा. काही कठीण कामे तुमच्यासमोर येतील पण तुम्ही ती यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे.आज तुमचे भाग्य 68% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा.
धनु : कुटुंबात तणाव जाणवेल त्यापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांना भेटल्याने आनंद मिळेल. वैयक्तिक आयुष्यात कोणालाही वचन देऊ नका ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांना भेटा. कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील. सहकारी तुमच्या कामात मदत करतील. भावाच्या सल्ल्याने काम करा यश मिळेल.आज तुमचे भाग्य 79% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.
मकर : घरात आनंदी वातावरण राहीलमुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कुटुंबातील काही रखडलेली कामे तुमच्या भाऊ-बहिणीच्या मदतीने पूर्ण होतील. बाहेरचे खाणे टाळा नाहीतर तब्येत बिघडू शकते. तुमच्या जीवनसाथीचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. घरात आनंदी वातावरण राहील. सहकाऱ्यांना नवीन ज्ञान आणि संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी सुधारणा करा.आज तुमचे भाग्य 86% तुमच्या बाजूने असेल. पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकराला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा.
कुंभ : आज जे लोक राजकारणात आहेत त्यांना यश मिळेल. जीवनसाथीच्या भावना समजून घ्या. तुमचा जोडीदार आज आनंदी असेल. भूतकाळ आणि भविष्याच्या योजनांमध्ये अडकू नका. वर्तमानात जगा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. काळजीपूर्वक काम केल्यास चांगली संधी मिळू शकते. तुमचा व्यवसाय वाढेल. आज कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो त्यामुळे सावध राहा आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.आज तुमचे भाग्य 83% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
मीन : आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतित होऊ शकता. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. ओळखीच्या व्यक्तीमुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. काही खर्च तुमच्यासमोर येतील जे तुम्हाला नाईलाजाने करावे लागतील. तुमच्या आर्थिक स्थितीनुसार खर्च करा.आज तुमचे भाग्य 88% तुमच्या बाजूने असेल. दररोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.