WhatsApp

नेपाळनंतर तुर्कियेमध्ये सोशल मीडियावर गाजला बंदीचा गाजावाजा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तुर्कियेमध्ये सोमवारी अचानक सोशल मीडिया वापरावर मोठा बंधनकारक निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सोशल मीडिया बंदीनंतर हा प्रकार घडल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कियेमध्ये एक्स, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मना अचानक अ‍ॅक्सेस बंद करण्यात आला. त्यासोबत इंटरनेटही तब्बल १२ तास ठप्प झाल्याचा अनुभव स्थानिक नागरिकांना आला. अधिकृत घोषणा न करता ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप वाढला आहे.



नागरिकांचा संताप उफाळला
नेपाळप्रमाणेच तुर्कियेमध्येही अचानक आलेल्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सरकारविरोधी पोस्ट्स शेअर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली. मात्र इंटरनेट बंद असल्याने तेही शक्य झाले नाही. त्यामुळे अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेधाची तयारी केली आहे. कामकाजासाठी सोशल मीडियावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत अनेकांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारकडून अधिकृत घोषणा नाही
आश्चर्य म्हणजे, इतक्या मोठ्या निर्णयावर तुर्किये सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेतला गेला असल्याचा कयास लावला जातोय. मात्र, नागरिकांच्या मते हा निर्णय पारदर्शक नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. तुर्कियेतील परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवसांत या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!