WhatsApp

अवकाळी आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी बातमी; सरकारकडून शेती नुकसानीची भरपाई जाहीर

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात, तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ दरम्यान धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी एकूण ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदतनिधीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.



विभागांनुसार मदतनिधी राज्य सरकारने विभागांनुसार मदतनिधीचे वाटप केले आहे.

  • छत्रपती संभाजीनगर विभाग : जून २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजार रुपये.
  • अमरावती विभाग : जून २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी ८६ कोटी २३ लाख ३८ हजार रुपये.
  • धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे : सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ या काळातील नुकसानीसाठी २६८ कोटी ८ लाख ८३ हजार रुपये.

या मदतीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होण्यास मदत होईल.

जिल्हानिहाय मदतीचा तपशील जून २०२५ मधील नुकसानीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील चार जिल्ह्यांना मदत मिळणार आहे:

Watch Ad
  • छत्रपती संभाजीनगर : १७१ शेतकऱ्यांच्या ७२.३२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १६.०१ लाख रुपये.
  • हिंगोली : ३,२४७ शेतकऱ्यांच्या १,६११.३७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३६०.४५ लाख रुपये.
  • नांदेड : ७,४९८ शेतकऱ्यांच्या ४,७९०.७८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १,०७६.१९ लाख रुपये.
  • बीड : १०३ शेतकऱ्यांच्या ११ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १.९९ लाख रुपये.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी मदत जाहीर झाली आहे:

  • अमरावती : २,२४० शेतकऱ्यांच्या १,३१२.०२ हेक्टरसाठी २७५.७९ लाख रुपये.
  • अकोला : ६,१३६ शेतकऱ्यांच्या ३,७९०.३१ हेक्टरसाठी ४०५.९० लाख रुपये.
  • यवतमाळ : १८६ शेतकऱ्यांच्या १३०.५० हेक्टरसाठी २५.४५ लाख रुपये.
  • बुलढाणा : ९०,३८३ शेतकऱ्यांच्या ८७,३९०.०२ हेक्टरसाठी ७,४४५.०३ लाख रुपये.
  • वाशिम : ८,५२७ शेतकऱ्यांच्या ५,१६२.२८ हेक्टरसाठी ४७१.२१ लाख रुपये.

सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ या काळातील नुकसानीसाठी धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे:

  • धाराशिव : ३,२७,९३९ शेतकऱ्यांच्या १,८९,६१०.७० हेक्टरसाठी २६,१४३.३८ लाख रुपये.
  • छत्रपती संभाजीनगर : ७,५४८ शेतकऱ्यांच्या ४,८९१.०५ हेक्टरसाठी ६६५.४१ लाख रुपये.
  • धुळे : एका शेतकऱ्याच्या नुकसानीसाठी ४,००० रुपये.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी या मदतनिधीवर प्रतिक्रिया देताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी सांगितले की, “नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आहे. आम्ही तातडीने पंचनामे पूर्ण करून निधीला मंजुरी दिली आहे. राज्य सरकार शेती, शेतकरी आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

Leave a Comment

error: Content is protected !!