WhatsApp

एसटी महामंडळात ३६७ पदांची भरती! अर्ज कसा कराल? संपूर्ण मार्गदर्शन एका क्लिकमध्ये

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात प्रशिक्षणार्थी पदांसाठी एकूण ३६७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडावी.



विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी संधी
या भरतीमध्ये अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक मोटार व्हेईकल, मॅकेनिक डिझेल, फिटर, वेल्डर, टर्नर, कारपेंटर, पेंटर, शिटमेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन अशा विविध व्यवसायिक प्रशिक्षणासाठी पदांचा समावेश आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यवसायातील पात्रता किंवा शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया कशी कराल?
उमेदवारांनी http://www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात उपलब्ध असलेला अर्ज नमुना भरून सादर करावा लागेल.

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध
ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन नोंदणी व ऑफलाइन अर्ज सादरीकरण अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार आहे. उमेदवारांना भरलेला अर्ज नाशिक विभागीय कार्यालयात (एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक) प्रत्यक्ष सादर करावा लागेल.

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी दिलासा
राज्य शासनाकडून सध्या बर्‍याच भरत्या थांबवण्यात आलेल्या असताना एसटी महामंडळात सुरू झालेली भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. कमी पात्रतेत सरकारी प्रशिक्षणाची संधी मिळवणाऱ्यांसाठी ही संधी दवडू नका.

Leave a Comment

error: Content is protected !!