WhatsApp

घरच्या घरी करा फेशियल! 7 दिवसांत मिळवा नैसर्गिक ग्लो, तेही महागड्या पार्लरशिवाय

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : महागड्या फेशियल आणि ब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांवर हजारो रुपये खर्च करूनही चेहऱ्यावर हवेसे तेज दिसत नाही, अशी तक्रार अनेक महिलांची असते. पण आता घरच्या घरी, तेही अगदी कमी वेळात आणि नैसर्गिकरीत्या चेहऱ्यावर ग्लो आणण्याचा उपाय सहज शक्य आहे. त्यासाठी लागेल फक्त एकच घटक – बीट अर्थात बीटरूट!



बीट फेस क्यूब्सने मिळवा चमकदार त्वचा
बीटमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि पिगमेंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला आतून पोषण देतात. बीट फेस क्यूब्स हे रोज वापरल्यास 7 दिवसात त्वचेला फेशियलसारखा ग्लो मिळतो.

बीट फेस क्यूब्स कसे बनवाल?

  • बीटाची साले काढून त्याचा रस काढा.
  • तो रस बर्फाच्या ट्रेमध्ये ओता.
  • ट्रे फ्रीजमध्ये ठेवा आणि बर्फाचे क्यूब्स तयार होऊ द्या.

कसे वापरावे?

  • सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी, चेहऱ्यावर एक बीट फेस क्यूब हलक्या हाताने फिरवा.
  • क्यूब पूर्णपणे वितळेपर्यंत वापरा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.
  • 7 दिवस सतत वापरल्यास त्वचेचा टोन सुधारतो आणि ग्लो वाढतो.

आइस फेशियलचे फायदे
पिंपल्सवर आराम
बीटमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचे मुरुम कमी होतात आणि सूजही जाते.

पोर्स टाईट होतात
बर्फ त्वचेचे उघडे पोर्स आकुंचन करून त्वचेला घट्ट बनवतो, ज्यामुळे तेलकटपणा कमी होतो.

डार्क सर्कल्स कमी होतात
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूजही आइस फेशियलमुळे कमी होते. चेहऱ्यावर फ्रेश आणि जागृत लूक येतो.

त्वचेला नैसर्गिक पोषण
रासायनिक प्रॉडक्ट्सऐवजी नैसर्गिक घटकांमुळे कोणतेही साइड इफेक्ट्स न होता त्वचा हेल्दी राहते.

बीट फेस क्यूब्स हा घरच्या घरी, कमी वेळात आणि अत्यंत कमी खर्चात फेशियलचा प्रभाव देणारा उत्तम पर्याय आहे. फक्त सात दिवस वापरा आणि स्वतःच परिणाम अनुभवा.

Leave a Comment

error: Content is protected !!