WhatsApp

श्रावणात भक्तीबरोबर महागाईचा धक्का! नारळाचे दर गगनाला भिडले, सामान्यांची खळबळ

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला|
श्रावण महिन्याच्या प्रारंभासोबतच भक्तिमय वातावरण तयार झाले असतानाच सामान्य ग्राहकांना नारळाच्या वाढलेल्या किमतींचा फटका बसतो आहे. देवपूजेपासून नैवेद्यापर्यंत अत्यावश्यक असलेला नारळ आता सामान्यांच्या खिशाला चांगलाच झणझणीत बसत आहे.



नारळाचे दर झाले दुपटीने
याआधी २५ ते ३५ रुपयांत सहज मिळणारा नारळ सध्या ४० ते ५० रुपयांपर्यंत विकला जात आहे. विशेषतः मुंबई आणि नवी मुंबई परिसरात दरात लक्षणीय वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, मागणी वाढलेली असून पुरवठा कमी असल्यामुळे हा तफावत दरांवर प्रभाव टाकते आहे.

दक्षिणेकडून पुरवठा घटला
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर नारळ महाराष्ट्रात येतो. मात्र यंदा या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे आणि काही भागांत अवकाळी पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय कीड लागवडीमुळेही उत्पादनात घट झाली आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी
श्रावण महिना, नागपंचमी, राखी, जनमाष्टमी आणि पुढील येणाऱ्या गणेशोत्सवामुळे नारळाची मागणी वाढणारच आहे. त्यामुळे सण साजरे करताना आर्थिक गणित कोलमडण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे.



Watch Ad

व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले की, पुरवठा व मागणी यामधील तफावत ही दरवाढीमागील मुख्य कारण आहे. सध्या दर काही काळ असेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment