WhatsApp

केवळ १ रुपयांत धमाका! बीएसएनएलचा ‘फ्रीडम प्लॅन’; कॉलिंग, डेटा आणि एसएमएस मोफत

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली –
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक योजना जाहीर केली आहे. ‘फ्रीडम प्लॅन’ नावाच्या या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ १ रुपयांत ३० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएसची सेवा दिली जाणार आहे. यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.



  • फक्त १ रुपयांत प्लॅन: हा प्लॅन केवळ १ रुपयात उपलब्ध असून त्यात ३० दिवसांची वैधता आहे.
  • २ जीबी डेटा प्रतिदिन: ग्राहकांना दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे.
  • अमर्यादित कॉलिंग: लोकल आणि एसटीडी कॉलिंगवर कोणतीही मर्यादा नाही.
  • १०० एसएमएस प्रतिदिन: दररोज १०० मोफत मेसेज पाठवण्याची सुविधा.
  • फ्री सिमकार्ड: नव्या ग्राहकांना बीएसएनएलचं सिम मोफत दिलं जाणार आहे.

बीएसएनएलचा स्वदेशी ४जी प्लॅन – बीएसएनएलने देशभरात १ लाख ठिकाणी आपले ४जी नेटवर्क स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जात असून यामध्ये खासगी कंपन्यांच्या दबावाशिवाय सेवा दिली जात आहे. बीएसएनएलने यापूर्वीही १४७ रुपयांत डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह सर्व्हिस उपलब्ध करून दिली होती. त्याचा लाखो ग्राहकांना फायदा झाला होता.

सेवेची गुणवत्ता आणि भविष्यातील योजना – जरी बीएसएनएलच्या सेवा अद्याप अनेक ठिकाणी खंडित असल्या, तरी सरकारच्या पाठबळाने ती सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीने ५जी सेवेसाठीही तयारी सुरू केली असून लवकरच काही प्रमुख शहरांमध्ये बीएसएनएल ५जी सुरु होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांचा प्रतिसाद – महागड्या प्लॅनमुळे वैतागलेल्या ग्राहकांना आता बीएसएनएलचा हा नवा प्लॅन अधिक परवडणारा आणि उपयुक्त वाटतो आहे. दुय्यम सिम ठेवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन खूप फायदेशीर ठरू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!