WhatsApp

कोण होणार देशाचा नवा उपराष्ट्रपती? निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ९ सप्टेंबर २०२५ रोजी या पदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणीदेखील होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नुकताच राजीनामा दिला असून, त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.



संपूर्ण कार्यक्रम असा आहे –

  • अधिसूचना प्रसिद्धी: ७ ऑगस्ट २०२५
  • नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख: २१ ऑगस्ट
  • नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट
  • मतदानाचा दिवस: ९ सप्टेंबर, सकाळी १० ते संध्याकाळी ५
  • मतमोजणी: ९ सप्टेंबर संध्याकाळी

कोण आहेत मतदार?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्य मतदान करतात. हे मतदान गुप्त आणि एकरंगी (single transferable vote) पद्धतीने होते. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडेल.

राजकीय गणित सत्ताधाऱ्यांच्या बाजूने
सद्यस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे संख्याबळ मजबूत असल्याने, ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी फारशी अडचणीत येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, विरोधक कोणत्या चेहऱ्यावर एकवटतात आणि भाजपाचे उमेदवार कोण असतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राजकीय चर्चांना उधाण
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, हा कळीचा मुद्दा ठरतोय. तसेच, एनडीए आणि इंडिया आघाडीतून कोणते चेहरे समोर येतात, यावर आगामी राजकारणाच्या दिशाही स्पष्ट होऊ शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!