याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी २३ फेब्रुवारी रोजी जारी केले होते. आयुक्त द्विवेदी यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे नवे आयुक्त कोण? याबाबत सर्वांना उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज याला पूर्ण विराम लागला असून अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका येथे कार्यरत असलेले डॉक्टर सुनील लहाने यांची नेमणूक करण्यात आल्याचा आदेश आज सायंकाळी येऊन धडकला.
कविता द्विवेदी ह्या महापालिकेच्या त्या दुसऱ्या प्रशासकीय अधिकारी राहिल्या. द्विवेदी यांना मनपातील अनेेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा सामना करावा लागला. शासनाने बदली आदेश जारी केल्यानंतरही अधिकारी रूजू हाेत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा सर्व भार आयुक्त द्विवेदी यांच्यावर आल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीतही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणत दर महिन्याच्या ठराविक तारखेला वेतन देण्याचा निर्णय घेतला. रस्ते, नाल्या, उद्यान व इतर विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या आयुक्तांच्या धाेरणामुळे कंत्राटदारांनी विकास कामांचा दर्जा व गुणवत्ता कायम राहील,याकडे लक्ष दिले.
डॉ. सुनील लहाने हे मूळचे माकेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील रहिवासी आहेत. त्यांनी परभणीच्या पशुशल्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९८ मध्ये मुख्याधिकारीपदी निवड झाली. त्यांनी आतापर्यंत पैठण, वसमत, लोणावळा, इस्लामपूर या नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर अहमदनगर, वसई विरार, कल्याण डोंबिवली महापालिकेत उपायुक्त तसेच वरळी, मुंबईच्या नगरपालिका प्रशासन संचालनालयात उपसंचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत ते कार्यरत होते. व सद्या ते अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका येथे कार्यरत होते. आता त्यांची अकोला महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते आपला पदभार स्वीकारतील अशी आशा आहे.
सर मला तुमचा मोबाइल नंबर पाठवा माझा मोबाईल नंबर ९४२२८६४६६९ माझ्या अडचणी जेणेकरुन आपल्या सोबत शेअर करण्यासाठी plese I request to you sir please
Send your mobile no. On my WhatsApp