अकोला न्यूज नेटवर्क
इंदौर : ब्राह्मण असल्याचं सांगून एका तरुणीने लग्न केलं, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या तोंडून ‘या अल्लाह’, ‘अल्लाह कसम’ असे शब्द ऐकू येताच नवऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये घडलेल्या या घटनेनं सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा सुरू झाली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणाने आपल्या लग्नासाठी वधू पाहत होता. त्यावेळी मुकेश मराठा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. मुकेशने २० हजार रुपये घेऊन ‘ब्राह्मण आणि अविवाहित’ असलेली मुलगी दाखवण्याचं कबूल केलं. काही दिवसांनी त्याने ‘निकिता’ नावाच्या तरुणीशी ओळख करून दिली. तिच्याशी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी विवाह पार पडला.
लग्नाच्या काही दिवसांनी घरात बोलता बोलता तिच्या तोंडून ‘या अल्लाह’ आणि ‘अल्लाह कसम’ असे शब्द ऐकून कुटुंबीयांना संशय आला. चौकशीत तिने कबूल केलं की तिचं खरे नाव ‘नाजिया’ असून ती मुस्लिम आहे. यावरच थांबत नाही, काही दिवसांनी शाहनवाज नावाच्या व्यक्तीचा फोन आला, ज्याने सांगितलं की नाजिया ही त्याची पत्नी असून त्यांना पाच वर्षांचा मुलगाही आहे. हे ऐकताच नवरा तरुण पूर्णपणे हादरला.
यानंतर काही दिवसांत नाजिया घरातील सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचं सामान घेऊन अचानक फरार झाली. शोध घेतल्यावर ती भाड्याच्या खोलीत राहत असल्याचं समजलं. तरुण तिला भेटायला गेला असता तिच्या आईने धमक्या दिल्याचा आरोप त्याने केला आहे.
पीडित तरुणाने प्रथम पोलिसांत तक्रार दिली होती, मात्र काहीच कारवाई न झाल्यामुळे त्याने परशुराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे.
या घटनेमुळे लग्नासाठी ऑनलाईन किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून होत असलेल्या जोडण्यांची सत्यता तपासण्याची गरज अधोरेखित झाली आहे. फसवणुकीसारख्या घटनांमुळे समाजात निर्माण होणारा अविश्वास आणि धार्मिक फसवेगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.