अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग अकोला जिल्हा रिपोर्टर दिनांक २७ जुलै २०२५ राजराजेश्वर कावड महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांकडून कडक सुरक्षा उपाययोजना! चेंगराचेंगरी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचा कडक इशारा. काय आहे नियोजन? सविस्तर वाचा…
कावड महोत्सवासाठी पोलिसांची विशेष बैठक; सुरक्षा बंदोबस्तात कोणती तयारी?
अकोल्यातील श्री राजराजेश्वर कावड महोत्सव जसा श्रद्धेचा महापर्व आहे, तसाच तो पोलिसांसाठी जबाबदारीचा काळ आहे. यंदा हरिद्वारसारखी चेंगराचेंगरी अकोल्यात घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी थेट सूचनांचा पाऊस पाडला आहे. निमवाडी येथील विजय हॉलमध्ये झालेल्या विशेष बैठकीत श्री. चांडक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला सज्ज राहण्याचा आदेश दिला.
श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारपासून गांधीग्राम परिसरातून पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन हजारो भाविक कावड घेऊन श्री राजराजेश्वर मंदिरात दाखल होतात. या गर्दीचे अचूक नियोजन, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्था आणि अफवांवर नियंत्रण यासाठी पोलीस पूर्ण सज्ज आहेत.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी यंत्रणा सतर्क; कायदा व सुव्यवस्थेवर भर
या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, सतीश कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी स्पष्टपणे बजावले की, कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. प्रत्येक पोलीस स्टेशनने आपले स्वतंत्र नियोजन पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यस्थळी अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
कावड मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रणासाठी दंगा नियंत्रण पथक, तसेच आपत्कालीन वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात असून, कोणतीही चुक माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
आपल्या शहरातील धार्मिक महोत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि शांतता राखा. अशा आणखी स्थानिक बातम्यांसाठी www.akolanews.in ला भेट द्या.