WhatsApp

प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट! पत्नीला सोडून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणाला गर्लफ्रेंडनेच लुटले

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
मुंबईत एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेचा भयानक शेवट समोर आला आहे. एका तरुणाला या प्रकरणाने सर्व काही गमवावे लागले आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला सोडून एका विवाहित क्लासमेटसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत केले, पण त्याच्या याच गर्लफ्रेंडने त्याला लुटले. इतकेच नाही तर त्याला धावत्या रिक्षातून धक्काही मारून ती पळून गेली. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी महिला, तिचा मुलगा आणि अन्य सात आरोपींविरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या विवाहित क्लासमेटसोबत अफेअर सुरू केले होते. दोघांनीही निर्णय घेतला की, त्यांच्या पार्टनरसोबत घटस्फोट घेऊन दोघे एकत्र राहतील. त्यानंतर या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला घटस्फोट दिला आणि क्लासमेटसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. पण ही चूक त्याला खूप महागात पडली. यासाठी त्या व्यक्तीने आपले कुटुंब सोडले होते, पण त्याच तरुणीने त्याला फसवले आणि लुटले.

नेमके काय घडले?

ही धक्कादायक घटना चुनाभट्टी परिसरात घडली आहे. एका ४८ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने आपली जुनी क्लासमेट आणि तिच्या ७ सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याचे लग्न २००३ मध्ये झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्याची जुन्या क्लासमेटसोबत भेट झाली. त्यांच्यात जवळीक वाढल्यानंतर त्यांनी एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला. यासाठी पीडित तरुणाने २०२१ मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.

पीडित व्यक्तीने म्हटले आहे की, त्यानंतर त्याची क्लासमेट आणि तो एकत्र राहू लागले. याचदरम्यान, तिने घर खरेदी करण्यासाठी १५ लाखांची मदत मागितली. तरुणाने काहीही विचार न करता तिला पैसे दिले. त्यानंतर त्याने तिला तिच्या पतीसोबत घटस्फोट कधी घेत आहे, असे विचारले, पण तिने समाधानकारक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. तेव्हा ती म्हणाली, “आधी तू पीएफमध्ये मला वारस कर आणि घर माझ्या नावावर कर. तरच मी तुझ्याशी लग्न करेल.” तरुणाने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी कुटुंबासमोर हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पीडित व्यक्तीने दिली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!