WhatsApp

जगभरात मोदींची लोकप्रियता कायम: जागतिक नेत्यांच्या यादीत ७५% अप्रुव्हलसह पुन्हा अव्वल, ट्रम्प पिछाडीवर!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजन्स फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘डेमोक्रॅटिक लीडर अप्रुव्हल रेटिंग्ज’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ७५ टक्के अप्रुव्हल स्कोअरसह अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या यादीत पहिल्या पाचमध्येही नाहीत, तर त्यांना ४५ टक्के अप्रुव्हलसह आठवे स्थान मिळाले आहे.



४ ते १० जुलै २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंग’मध्ये जगातील विविध देशांमधील प्रौढ व्यक्तींनी दिलेल्या मतांची सात दिवसांची सरासरी वापरण्यात आली आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ ही अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजन्स अँड डेटा ॲनालिटिक्स कंपनी असून, ती विशेषतः लोकशाही असलेल्या देशांमधील जागतिक नेत्यांची पब्लिक अप्रुव्हल रेटिंग दररोज हजारो लोकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून मोजते.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष

या सर्वेक्षणात असे आढळून आले की, सहभागी झालेल्या प्रत्येक चारपैकी तीन लोक मोदी हे लोकशाहीवादी नेते असल्याबद्दल सकारात्मक होते. तर १८ टक्के लोकांची तशी भावना नव्हती, आणि ७ टक्के लोकांचे मत स्पष्ट नव्हते किंवा त्यांना खात्री नव्हती.

पंतप्रधान मोदींनंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी ५९ टक्के अप्रुव्हल स्कोअरसह दुसरे स्थान पटकावले आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर येऊन त्यांना फक्त एक महिना झाला असल्याने, त्यांना मिळालेले हे दुसरे स्थान आश्चर्यकारक मानले जात आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५९ टक्के लोकांनी त्यांच्या नेतृत्वाला पसंती दिली, २९ टक्के लोकांनी त्यांचे नेतृत्व नाकारले, तर सुमारे १३ टक्के लोकांना त्यांच्याबद्दल खात्री नव्हती.

ट्रम्प यांचा आठवा क्रमांक

गेल्या वर्षी अमेरिकेत सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना या यादीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. केवळ ४४ टक्के लोकांनी त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांची धोरणे, जसे की ट्रेड टॅरिफ आणि अंतर्गत निर्णय, यामुळे त्यांच्या लोकप्रियतेला तडा गेला असण्याची शक्यता आहे.

जागतिक टॉप पाच लोकशाही नेते

१. नरेंद्र मोदी (भारत) – ७५ टक्के अप्रुव्हल २. ली जे-म्युंग (दक्षिण कोरिया) – ५९ टक्के अप्रुव्हल ३. जेवियर मिलेई (अर्जेंटिना) – ५७ टक्के अप्रुव्हल ४. मार्क कार्नी (कॅनडा) – ५६ टक्के अप्रुव्हल ५. अँथनी अल्बानिज (ऑस्ट्रेलिया) – ५४ टक्के अप्रुव्हल

पंतप्रधान मोदींची ही विक्रमी लोकप्रियता त्यांच्या धोरणांवर आणि कामावर जनतेचा असलेला विश्वास दर्शवते.

Leave a Comment

error: Content is protected !!