अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | अकोल्यातील इच्छुक बेरोजगारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी, दि. २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध खाजगी कंपन्यांमार्फत जवळपास ४०० पदांची भरती केली जाणार आहे.
सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी अकोला जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक आणि ओळखपत्रांची कागदपत्रे सोबत ठेवून प्रत्यक्ष मेळाव्यास उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कंपन्यांची आणि पदांची माहिती:
या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख कंपन्या आणि पदे खालीलप्रमाणे आहेत:
- ओझोन हॉस्पिटल, अकोला: स्टाफ नर्स (10 पदे), पात्रता – ए.एन.एम./जि.एन.एम./बी.एससी नर्सिंग, वयोमर्यादा 18-35.
- शोपन्झा सर्व्हिसेस: सेल्स एक्झिक्युटिव्ह, बँक ऑफिसर, फील्ड ऑफिसर, वाहन चालक – एकूण 16 पदे, पात्रता 10वी/12वी पास, वय 21-35.
- भारतीय जीवन विमा निगम: विमा सखी (50 पदे – महिलांसाठी), पात्रता 12वी पास, वय 21-45.
- आकाश ॲग्री युनिट: कॅम्प्युटर ऑपरेटर, डिस्पॅचर, हेल्पर – एकूण 5 पदे.
- अस्पा ग्लोबल सर्व्हिसेस: फील्ड एक्झिक्युटिव्ह (20 पदे), पात्रता 10वी/12वी पास.
- साईनाथ ॲग्रो इंजिनिअर्स: पीपीओ, इलेक्ट्रीशियन, फिटर – एकूण 10 पदे, पात्रता ITI.
- शिवशक्ती ॲग्री लिमिटेड, नागपूर: ॲग्रीकल्चर ऑफिसर (10 पदे), सेल्स प्रतिनिधी (30 पदे), एकूण 40 पदे.
- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक: क्रेडिट ऑफिसर (50 पदे), पात्रता 12वी/पदवी.
- खंडेलवाल ऑटो व्हील्स: विविध पदांसाठी 9 जागा – सर्व्हिस ॲडव्हायझर, एक्सेल ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह इत्यादी.
- प्रभ व्हेईकल्स, अकोला: विक्री सल्लागार, टीम लीडर, यांत्रिक मॅकेनिक – एकूण 10 पदे.
- परम कॉर्पोरेशन, संभाजीनगर: ट्रेनी (100 पदे), पात्रता 12वी/ITI.
- खंडेलवाल ज्वेलर्स: कॅशिअर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर – एकूण 18 पदे.
- डिलीव्हरी डॉटकॉम, अकोला: डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह – 30 पदे.
- राधाकुंज पर्यटन केंद्र, अंत्री: मॅनेजर, अकाउंटंट, ट्रेनी (वेल्डर, फॅब्रीकेटर) – एकूण 8 पदे.
या रोजगार मेळाव्यात १२वी पास, ITI धारक, डिप्लोमा तसेच विविध शाखांचे पदवीधर यांना संधी देण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये हॉस्पिटल, फायनान्स, ऑटोमोबाईल, अॅग्रिकल्चर, लॉजिस्टिक, विमा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचा समावेश असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.