WhatsApp

“बायको, मित्र आणि खून: एका राजकीय कार्यकर्त्याच्या मृत्यूमागचं धक्कादायक सत्य”

Share

अकोला न्यूज नेटवर्क
कोल्हापूर |
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य लखन आण्णाप्पा बेनाडे (३६) यांचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी त्यांच्या मित्रासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात ही खळबळजनक बाब समोर आली आहे.



लखन बेनाडे यांचा मित्र विशाल घस्ते याला दोन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती. या काळात त्याची पत्नी लक्ष्मी हीने बचत गटाच्या कर्जासाठी लखन यांची मदत घेतली होती. मात्र, या संबंधात लखनने तिचा गैरफायदा घेत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप समोर आला आहे. तसंच, तो सतत व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

विशाल घस्ते जेलमधून सुटल्यानंतर लक्ष्मीने घर सोडले आणि स्वतंत्रपणे राहू लागली. मात्र, लखनने दोघांवर विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी करून मानसिक त्रास देणे सुरू ठेवले. अखेर, १० जुलै २०२५ रोजी लखनने लक्ष्मीला भेटण्यासाठी बोलावले. तिथे वाद झाल्यानंतर लक्ष्मीने विशालला संपर्क साधून खुनाचा कट रचला.

विशालने आकाश उर्फ माया घस्ते, संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांच्यासह लखनचा पाठलाग सुरू केला. सायबर चौकात त्याला पाहताच, तवेरा गाडीतून पाठलाग करत शाहू टोलनाक्यावर त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर संकेश्वरजवळ नदीकाठी त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह अर्धवट जाळून नदीत फेकण्यात आला.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. उजळाईवाडी येथील कार वॉश सेंटरमध्ये विशालला अटक करून चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, चौकशीत खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी इतर चार आरोपींनाही ताब्यात घेतले.

लखन बेनाडे यांच्या हत्येने संपूर्ण रांगोळी परिसर हादरला आहे. राजकीय क्षेत्रातही या हत्येमुळे संताप व्यक्त होत असून, पोलिसांचा तपास सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेहाचे अवशेष, वापरलेली गाडी आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!