WhatsApp

तटरक्षक दलात १७० अधिकारी पदांची भरती, पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नवी दिल्ली |
इंडियन कोस्ट गार्ड (ICG) अंतर्गत २०२७ बॅचसाठी १७० असिस्टंट कमांडंट (ग्रुप-A गॅझेटेड ऑफिसर) पदांवर भरती जाहीर झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी ब्रँचसाठी १४० आणि टेक्निकल ब्रँचसाठी ३० पदांचा समावेश आहे. जनरल ड्युटी पदासाठी कोणतीही पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने १२वीत फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषय घेतलेले असावेत. टेक्निकल पदांसाठी संबंधित शाखेतील इंजिनीअरिंग पदवी आवश्यक आहे.



वयोमर्यादा व शारीरिक मापदंड:
दोन्ही ब्रँचेससाठी वयोमर्यादा २१ ते २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जुलै २००१ ते ३० जून २००५ दरम्यानचा असावा. उंची किमान १५७ सेंमी, वजन वय आणि उंचीनुसार, छाती किमान ५ सेंमी फुगवता येणे आवश्यक आहे. दृष्टीसाठी विशिष्ट निकष लागू आहेत.

निवड प्रक्रिया आणि परीक्षा स्वरूप:
निवड प्रक्रियेत पाच टप्पे आहेत. प्रथम टप्प्यात १८ सप्टेंबर २०२५ रोजी CGCAT ही संगणकाधारित परीक्षा घेतली जाईल. १०० प्रश्न, ४०० गुण, २ तास कालावधी, निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असेल. यानंतर प्रीलिमिनरी सिलेक्शन बोर्ड (PSB), फायनल सिलेक्शन बोर्ड (FSB), वैद्यकीय तपासणी आणि अखेर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

प्रशिक्षण व पगाराचा तपशील:
निवड झालेल्या उमेदवारांना २७ डिसेंबर २०२६ पासून केरळमधील इंडियन नेव्हल ॲकॅडमीत ४४ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या पदासाठी ७ व्या वेतन आयोगानुसार पगार ५६,१००/- रुपये असून एकूण मासिक पॅकेज अंदाजे १.२५ लाख रुपये असेल. निवास आणि विमा कवच (१.२५ कोटी रुपये) देखील देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि संपर्क तपशील:
CGCAT परीक्षा १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाईल. प्रीलिमिनरी सिलेक्शन नोव्हेंबरमध्ये, फायनल सिलेक्शन जानेवारी-ऑक्टोबर २०२६ दरम्यान होईल. अंतिम गुणवत्ता यादी डिसेंबर २०२६ मध्ये जाहीर होईल. शंकासमाधानासाठी अधिकृत ईमेल व हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत. अर्जासाठी परीक्षा शुल्क ३०० रुपये आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!