WhatsApp

आईचं अमानुष रूप! मुलीची हत्या करून मृतदेहाशेजारीच प्रियकराबरोबर शारीरिक संबंध

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
लखनऊ |
रोशनी नावाच्या महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाशेजारीच प्रियकरासोबत रात्र घालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोशनीचा प्रियकर उदित याचाही या प्रकरणात सहभाग असून, या दोघांनी एकत्रितपणे मुलीचा खून केला. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.



हत्या लपवण्यासाठी पतीवर खोटा आरोप
गुन्हा केल्यानंतर रोशनीने खोटा साक्षीपुरावा तयार करत आपल्या विभक्त पती शाहरुखवरच मुलीच्या हत्येचा आरोप केला. पोलिसांना फोन करून तिने सांगितले की, शाहरुख त्यांच्या घरात चढून आला आणि त्याने सायनाची हत्या केली. मात्र, तपासात हे स्पष्ट झाले की शाहरुखच्या पायाची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याला चालताही येत नव्हते. तसेच, तो दोन दिवसांपासून इमारतीत दाखल झाल्याचे कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी रोशनीकडे पुन्हा तपास सुरू केला आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

चिमुकलीच्या निष्पाप डोळ्यांनी पाहिलं सत्य, पण…
गुन्ह्याच्या दिवशी, १३ जुलै रोजी, उदित रोशनीच्या घरी जेवण, दारू आणि ड्रग्ज घेऊन आला होता. त्यानंतर दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असताना रोशनीची मुलगी सायना अचानक खोलीत आली. तिने पाहिलेले दृश्य लपवण्यासाठी, दोघांनी तिच्या तोंडाला रुमाल बांधून तिला गुदमरवले आणि पोटावर पायाने दाब दिला. काही क्षणांतच सायनाचा मृत्यू झाला.

हत्यानंतरची विकृती – मृतदेहाशेजारी संबंध आणि झोप
सायनाचा श्वास थांबल्यानंतर, रोशनी आणि उदित यांनी आंघोळ केली, ड्रग्ज घेतले, दारू प्यायली आणि मृतदेहाजवळच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांनी त्या रात्री मृतदेहाजवळच जेवण केले आणि झोपले. दुसऱ्या दिवशीसुद्धा ते घरातच राहिले आणि ३६ तासांनंतरच पोलिसांना माहिती दिली. पोलिस चौकशीत हे सर्व धक्कादायक तपशील उघड झाले.

गुन्ह्याची कबुली आणि पोलिसांचा तपास
पोलिसांनी रोशनीला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तिने अखेर सत्य कबूल केले. तिने आणि उदितने मिळून सायनाचा खून केल्याचे मान्य केले. सायना ही त्यांच्या अवैध संबंधात अडथळा ठरत होती. रोशनीच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या पतीपासून वेगळी झाली होती, पण तिला घटस्फोट मिळालेला नव्हता. उदित हा तिच्या पतीचा जुना मित्र होता. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याने सायनाची हत्या करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!