अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुदीगुब्बा | आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात एका व्यक्तीचा शिरच्छेद करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेली अमानुष घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचा नाव विश्वनाथ असून, तो धर्मावरम येथील रहिवासी होता. अत्यंत क्रूरपणे घडवलेली ही हत्या केवळ कौटुंबिक वादावरून नव्हे, तर अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
💔 लग्न मोठ्या बहिणीशी, पण नातं जमलं धाकट्याशी!
विश्वनाथचे सुमारे २० वर्षांपूर्वी वेंकटरमणप्पा यांची मोठी मुलगी श्यामला हिच्याशी लग्न झाले होते. परंतु, काही वर्षांनंतर त्याचे श्यामलाची लहान बहीण (जिचे लग्नदेखील झाले होते) हिच्याशी अनैतिक संबंध सुरू झाले. या नात्यामुळे संपूर्ण कुटुंबात सतत वाद निर्माण होत होते. या अनैतिक नात्यामुळे सासरच्यांमध्ये चीड निर्माण झाली होती. त्यात भर म्हणून विश्वनाथ आपल्या सासूच्या नावावरील जमीन विकण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सासरे वेंकटरमणप्पा अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी सुडाचे ठरवले.
🗡️ ठरवून केलेली हत्या – ‘कट’ चार लाखांचा!
वेंकटरमणप्पाने आपल्या मित्र कटमय्या याला विश्वासात घेतले आणि ४ लाख रुपयांच्या मोबदल्यात हत्येचा करार केला. कटमय्याने ३ जुलै रोजी विश्वनाथला “शेतीसाठी मदत म्हणून ५०,००० रुपये देतो,” असे सांगून मुदीगुब्बा परिसरात बोलावले.
तेथे आधीच वेंकटरमणप्पा, कटमय्या आणि आणखी तीन साथीदार उपस्थित होते. त्यांनी विश्वनाथला निर्जन डोंगराळ भागात नेले, तिथे त्याचा गळा चिरून शिरच्छेद केला. मृतदेहाचे तुकडे करून त्याला डोंगरात फेकून दिले.
📱 मोबाईल लोकेशनमुळे उघड झाला खून
पोलिसांनी या घटनेचा तपास करताना मोबाईल टॉवर लोकेशन डेटा वापरला. हत्येच्या दिवशी सर्व आरोपी एकाच ठिकाणी उपस्थित होते हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली.
हत्येचा कट किती व्यवस्थित रचला गेला होता, याची प्रचिती तपासादरम्यान आलेल्या फोन रेकॉर्ड्स आणि लोकेशन ट्रेसिंग वरून मिळाली आहे. आता सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
प्रेम, संबंध, संपत्ती आणि सूड या चौकटीत गुंतलेली ही कहाणी केवळ कौटुंबिक नात्यांची नाही, तर मानवी क्रौर्याची झलक दाखवते. सख्ख्या नात्यांमध्ये विश्वासघात झाला आणि त्याचा शेवट एका निर्घृण खुनाने झाला. पोलिसांनी वेळेत तपास करत आरोपींना गजाआड केले, ही बाब सध्या चर्चेचा विषय बनली आहे.