अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पातूर | स्वप्निल सुरवाडे : येथिल १३२ के व्ही. उपकेंद्र येथे सर्प मित्रांनी महापारेषच्या वीज कर्मचाऱ्यांना सर्प दंश टाळण्यासाठी दक्षतेचे धडे गिरवले. सर्पदंश दक्षता व उपाययोजना या कार्यशाळेत वीज कर्मचारी यांना सर्पमित्रांनी प्रबोधन केले
महापारेषण अकोला सर्कलच्या अकोला विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंश टाळण्यासाठी दक्षता व उपाययोजना या कार्यशाळेचे आयीजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे हे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ सर्पमित्र बाळ काळणे, स्वप्निल सुरवाडे, दीपक पाटील, संजय बंड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता जामनिक साहेब, पटेल साहेब, उपकार्यकारी अभियंता मंगेश काळे, कमलेश दाभार्डे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यशाळेत उपस्थित सर्पमित्रांनी सापाबद्दलची अंधश्रद्धा, सापांचे प्रकार सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना या संदर्भात अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी बाळ काळणे, स्वप्निल सुरवाडे आणि दीपक पाटील आदी सर्पमित्रांनी सापाबद्दलची अभ्यासपूर्ण माहिती आपल्या भाषणातून मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद हंबर्डे यांनी अध्यक्षीय भाषणातून कार्यशाळा आयोजनाचे कौतुक करीत कर्मचाऱ्यांना या कार्यशाळेमुळे निसर्गाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली, असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेत मिळालेल्या अभ्यासपूर्ण माहिती मुळे सर्व कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल, असा आशावाद व्यक्त केला.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन गोपाल गाडगे यांनी तर आभार गजानन फाटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल गाडगे, अविनाश उमाळे, निलेश देशमुख, अनुराग देशपांडे, गजानन फाटकर, संगिता बंड, वंदना देवकर, विनोद राठोड, राहुल राठोड, विशाल ठाकरे गोपाल गिऱ्हे, सुहानी चव्हाण,गायत्री मेसरे, कोमल सोनोने, निलाक्षी गोतरकार, अनिल चव्हाण,हरिदास चव्हाण, गोपाल वगरे, विनेश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.