अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नागपूर | हृदयविकाराचा झटका (Heart Attack) ही आजची सर्वसामान्य वयातील देखील एक घातक समस्या ठरत आहे. विशेष म्हणजे हार्ट अटॅक हा अचानक न होता, महिनाभर आधीपासून शरीर वेगवेगळ्या लक्षणांनी इशारा देत असतो. मात्र, ही लक्षणं एखाद्या किरकोळ आजारासारखी वाटल्यामुळे दुर्लक्षित केली जातात.
🧠 थोडक्यात – ही लक्षणं दुर्लक्षित करू नका!
- रोजची कामं करताना अनावश्यक थकवा जाणवणे
- नेहमीपेक्षा लवकर श्वास लागणे
- चालताना दोन्ही हातांत जडपणा
- किराणा सामान उचलताना किंवा साफसफाई करताना छातीत घुसमट व जडपणा
- जेवणानंतर छातीत अडकल्यासारखं वाटणे
- शारीरिक संबंधांदरम्यान दम लागणे
ही सर्व लक्षणं काही मिनिटांत कमी होतात, त्यामुळे आपण याकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु ही हृदयविकाराचा इशारा असू शकतात.
💤 झोपेतून उठवतंय छातीत दुखणं?
काही गंभीर प्रकरणांमध्ये झोपेत असताना रुग्णाला घुसमट होऊन अचानक उठावं लागतं, आणि काही वेळ बसल्यावर बरे वाटते. ही लक्षणं ‘अॅसिडिटी’ समजून दुर्लक्षित केल्यास धोका वाढू शकतो.
🧪 घरीच करता येईल अशी तपासणी:
✅ वजन
✅ नाडीचा वेग
✅ ऑक्सिजनची पातळी
✅ रक्तदाब
✅ रक्तातील साखर (गरज असल्यास)
यातील अचानक बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🚩 काही संकेत जे आपण गृहीत धरतो…
- अचानक वजनात वाढ किंवा घट
- पाय सुजणे
- शांत बसल्यावरही हृदयाचे ठोके वाढणे
- लघवीचे वेळापत्रक बदलणे
- रक्तदाबात चढ-उतार
हे सर्व लक्षणं हार्ट अटॅकच्या शक्यतेकडे इशारा देत असतात.
⏱️ ‘गोल्डन अवर्स’ – हृदयविकाराच्या रुग्णांसाठी जीवन वाचवणारी वेळ
तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्या ६ तासांमध्ये उपचार मिळाले तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. पण बहुतेक वेळा रुग्ण १२ ते २४ तासांनीच डॉक्टरांकडे येतो.
“माझं सगळं ठणठणीत आहे, मला काय होतंय?” ही मानसिकता सर्वात मोठा अडथळा ठरतो.
👨⚕️ डॉक्टरांचं मत : “रोजच्या आयुष्यातील छोटे बदल दुर्लक्षित न करता, दर ६ महिन्यांनी आरोग्य तपासणी आवश्यक आहे. हृदय हे गप्प बसलेलं असलं तरी त्याचं ‘सिग्नलिंग सिस्टम’ सतत काम करत असतं. त्याचे सिग्नल आपण समजून घेतले नाहीत, तर मोठा धोका संभवतो.”
हार्ट अटॅक ‘अचानक’ येतो ही समजूत चुकीची आहे. अनेक वेळा त्याचे संकेत शरीर महिनाभर आधीच देत असते. त्यामुळे लक्षणं ओळखा, आरोग्याकडे दुर्लक्ष नको, आणि वेळेवर उपचार मिळवून जीव वाचवा. आपल्या प्रियजनांनाही हे लक्षणं ओळखण्याचं महत्व समजवा – कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उपयोगी पडत नाही.