अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला | आषाढी एकादशीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. आषाढी एकादशीला मनोभावे पूजा केल्यास समस्या दूर होतात. पण यंदा आषाढी एकादशी कधी साजरी केली जाणार आहे हे जाणून घेऊया.
हिंदू धर्मात आषाढी एकदाशीला खुप महत्व आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो. हा दिवस खुप शुभ मानला जातो. आषाढी एकादशीपासून भगवान योगिनीद्रात जातात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच चार महिने या अवस्थेत असतात. यामुळेच या काळाला चातुर्मास म्हणतात. यंदा आषाढी एकादशी ५ की ६ जुलै असा प्रश्न पडला असेल तर सविस्तरपणे जाणून घेऊया.
यंदा आषाढी एकादशी कधी?
दरवर्षी आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी तिथीला साजरी करण्यात येते. हिंदू पंचांगानूसार एकादशी तिथी ५ जुलै रोजी संध्याकाळी ६:१ वाजेपासून ६ जुलैला रात्री ९: १७ वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरा करण्यात येतो. यामुळे यंदा आषाढी एकदाशी ६ जुलै म्हणजेच रविवारी असणार आहे.
पुजेसाठी कोणते साहित्य लागते
विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, पाणी, पंचामृत, चंदन, हळद, कुंकु, अष्टगंध, बुक्का, तुळशी पत्र, नवीन वस्त्र, फळं, विड्याचे पानं, सुपारी, तांदूळ, अगरबत्ती, कापूर.
शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त – सकाळी ०४:०८ ते ०४:४९ पर्यंत
अभिजित मुहूर्त – दुपारी ११:५८ ते १२:५४ पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी ०२:४५ ते ०३:४० पर्यंत
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ७:२१ ते ०७:४२ पर्यंत
अमृत काल – दुपारी १२:५१ ते ०२:३८ पर्यंत
त्रिपुष्कर योग – रात्री ०९:१४ ते १०:४२ पर्यंत
रवि योग – सकाळी ०५:५६ ते रात्री १०:४२ पर्यंत
घरी कशी करावी पूजा
आषाढी एकादशीच्या दिवशी निरंकार उपावास केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर विठ्ठरायाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान करावे. आता स्वच्छ कपडे घालावे. नंतर हार घालावे. नंतर उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. नंतर आरती करावी. आषाढी एकादशीला तुळस तोडणे अशुभ मानले जाते.
1. आषाढी एकादशी 2025 मध्ये कधी आहे?
आषाढी एकादशी 2025 मध्ये 6 जुलै रविवार रोजी साजरी केली जाईल.
2. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे?
पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 7:30 ते 9:00 दरम्यान आहे; यावेळी पूजा आणि हरिपाठ करणे विशेष फलदायी मानले जाते.
3. आषाढी एकादशीला कोणती पूजा विधी केली जाते?
या दिवशी विठोबा-रखुमाईची पूजा, नामस्मरण, अभंग गायन, आणि उपवास करून हरिपाठ केला जातो.
4. उपवास करताना कोणते अन्नपदार्थ चालतात?
उपवासात साबुदाणा, रताळ्याचे कटलेट, शेंगदाणा, फळं आणि फराळाचे पदार्थ खाल्ले जातात.