WhatsApp

✨60 वयानंतरही 25 चेच दिसाल! पाणी पिण्याचे ‘हे’ 4 नियम पाळा, शरीर होईल फुल चार्ज!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला | आपण अनेकदा सौंदर्य प्रसाधनं, स्किन ट्रीटमेंट्स, आणि फिटनेस डाएट्स यामागे धावत असतो. पण हे सर्व उपाय ‘बाहेरून’ येतात. शरीराचं खरं सौंदर्य आणि आरोग्य हे ‘आतून’ येतं – आणि त्या अंतर्गत गोष्टींपैकी ‘पाणी’ हा सर्वात मूलभूत घटक आहे.



डॉ. मदन मोदी (सायकोलॉजिस्ट व हीलिंग तज्ज्ञ) यांच्यामते, “तुमचं वय काहीही असो, जर पाणी पिण्याच्या योग्य सवयी लावल्या, तर तुम्ही कायम पंचविशीचेच वाटाल!” जाणून घ्या त्या चार सोप्या पण प्रभावी सवयी, ज्या केवळ आरोग्यच नव्हे तर सौंदर्याचंही रक्षण करतात.


🌅 1. सकाळची सुरुवात ‘फक्त’ पाण्याने

आपण बहुतांश वेळा दिवसाची सुरुवात चहा, कॉफी, मोबाईल स्क्रोलिंगने करतो. पण डॉ. मोदी सांगतात की, “सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.”

  • यामुळे मेटाबॉलिझम सक्रिय होतो
  • बद्धकोष्ठता दूर होते
  • त्वचा उजळते, कारण डीटॉक्सिंग सुरू होतं
  • मेंदूला शुद्ध ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते

जर हा नियम तुम्ही पाळलात, तर शरीर आणि मन दोन्ही हलकं वाटू लागतं.


🧘‍♂️ 2. पाणी पिणं म्हणजे ‘ध्यान’ – घोट घोटानं प्या

अनेकजण पाणी गडगडाटी वेगाने प्यायल्याने पोटात गॅस, अजीर्ण, डोकेदुखी, मायग्रेनसारखे त्रास होतात. यासाठी पाणी ही क्रिया आहे, घाई नाही!

“लाळेतील एंझाइम्स पचन सुधारतात. ते फक्त ‘घोट घोटानं’ पाणी प्याल, तेव्हाच कार्यरत होतात.” त्यामुळे तुम्ही आरामात बसून, शांतपणे पाणी प्यायला सुरुवात करा.


🧊 3. थंडगार पाणी – शरीराचं ‘शत्रू’

उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधलं थंडगार पाणी प्यायल्यावर क्षणिक आनंद मिळतो. पण त्याचा दीर्घकालीन परिणाम असा की:

  • पचनक्रिया मंदावते
  • यकृतावर ताण येतो
  • शरीरात उष्णतेचं संतुलन बिघडतं

डॉ. मोदी सुचवतात: “मडक्यातलं नैसर्गिक थंड पाणी हेच सर्वोत्तम आहे. हे पाणी शरीराला सहज स्वीकारता येतं.”


🕐 4. जेवणाआधी आणि नंतर ‘हे’ वेळ सांभाळा

बऱ्याचजणांना सवय असते – जेवताना भरपूर पाणी पिण्याची, पण यामुळे पचनसंत्रण बिघडतं.

  • जेवणाआधी 30 मिनिटं आणि नंतर 30 मिनिटांनी पाणी प्यायला हवं
  • पोट फुगणं, अ‍ॅसिडिटी, गॅसेस या गोष्टींपासून मुक्तता
  • शरीरात पोषक घटक योग्यरीत्या शोषले जातात

पाणी उभं राहून पिऊ नका! – कारण यामुळे शरीरातील उर्जेचा प्रवाह बिघडतो, सांधेदुखी आणि गाठांचे त्रास निर्माण होऊ शकतात.


✨ पाणी – दीर्घायुष्याचं आणि सौंदर्याचं अचूक शस्त्र!

या चार नियमांचं सातत्याने पालन केलं तर,

  • त्वचेवर नैसर्गिक चमक येते
  • केस मजबूत राहतात
  • वजन संतुलित राहतं
  • मानसिक शांतता मिळते
  • शरीरात उर्जेचा संचार कायम राहतो

टीप:

हा लेख माहितीपर असून वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही आरोग्यविषयक बदल करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment

error: Content is protected !!