अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | आयकर रिटर्न भरण्याचा हंगाम सुरू झाला आहे, पण यंदा करदात्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण आयकर विभागाने नियम कडक केले असून, रिटर्न फाइल करताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळेही 200% दंड आणि तुरुंगवास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिटर्न फाईल करणे म्हणजे केवळ फॉर्म भरून काम संपले असे नाही. सादर केलेली माहिती बरोबर नसेल, उत्पन्न लपवले असेल किंवा चुकीचा करसवलतीचा दावा केला असेल, तर प्राप्तिकर कायद्यानुसार कारवाई टाळता येणार नाही.
❗ कोणत्या चुका टाळाव्यात?
- चुकीचा ITR फॉर्म निवडणे
- कुठलाही पुरावा न देता करसवलतीचा दावा करणे
- व्याज, भाडे इ. अतिरिक्त उत्पन्न लपवणे
- वैयक्तिक खर्च (प्रवास, जेवण) व्यवसाय खर्च म्हणून दाखवणे
- खोट्या HRA पावत्यांवर भाडेभत्ता मागणे
👨💼 CA किंवा एजंटकडून चूक झाली तरी जबाबदारी तुमचीच!
तुमचा रिटर्न चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा इतर एजंटकडून भरला असला तरी, कायदेशीर जबाबदारी तुमच्यावरच राहते. त्यामुळे तुमच्या रिटर्नमधील प्रत्येक माहितीची शहानिशा करणे हे अत्यावश्यक आहे.
🧾 कायद्यानुसार किती दंड?
- उत्पन्न लपवल्यास 200% पर्यंत दंड
- त्यावर 24% व्याज
- फसवणुकीचे पुरावे आढळल्यास तुरुंगवास
प्राप्तिकर विभागांकडे डेटा अॅनालिटिक्ससह सशक्त ट्रॅकिंग यंत्रणा आहे, ज्यामध्ये बँक ट्रान्झॅक्शन, TDS, PAN, आणि क्रेडिट कार्ड खर्चाची माहिती आधीच उपलब्ध असते. त्यामुळे काहीही लपवण्याचा प्रयत्न धोकादायक ठरतो.
🛡️ काय करावं?
- फॉर्म भरताना काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या
- उत्पन्नाचे सर्व स्रोत योग्य रीतीने नमूद करा
- सवलतींसाठी योग्य दस्तावेज अपलोड करा
- फसवणुकीच्या मार्गाला जाऊ नका
- शक्यतो तज्ञ मार्गदर्शनातच ITR दाखल करा
📢 जाणूनबुजून केलेली चूक माफीस पात्र ठरत नाही!
ITR फाईल करताना सावधगिरी हाच एकमेव मार्ग आहे.